इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन भगवान रामाच्या भक्तीत तल्लीन झालेला दिसला. सोमवारी (22 जानेवारी) अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला, ज्यामध्ये अनेक भारतीय क्रिकेटपटू उपस्थित होते. आता केविन पीटरसनही रामभक्तीच्या रंगात दिसला. पीटरसनने सोशल मीडियावर हिंदीत ‘जय श्री राम’ लिहिले आहे.
केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने आपल्या पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले. यापूर्वी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून भगवान रामावर पोस्ट टाकून भारतीय चाहत्यांची मने जिंकली होती. वॉर्नरने सोशल मीडियावर भगवान श्रीरामाचा फोटो शेअर केला होता. फोटोला कॅप्शन देत त्यांनी लिहिले की, “जय श्री राम इंडिया.” आता वॉर्नरनंतर पीटरसननेही भारतीय चाहत्यांना खूश केले आहे.
राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या कार्यक्रमात अनेक मोठे क्रिकेटपटू उपस्थित होते, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. याशिवाय महिला क्रिकेटपटूंमध्ये भारतीय संघाची माजी कर्णधार मिथाली राजनेही या कार्यक्रमात सहभाग घेतला. याशिवाय माजी फिरकीपटू अनिल कांबुले आणि वेगवान गोलंदाज आरपी सिंगसह अनेक क्रिकेटपटूही अयोध्येला पोहोचले होते. सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजा पत्नी रिवाबासोबत कार्यक्रमाला गेला होता.(kevin pietersen make social media post jai shree ram in hindi for lord ram know details)
जय श्री राम 👏
— Kevin Pietersen🦏 (@KP24) January 23, 2024
केविन पीटरसन इंग्लंडच्या अशा खेळाडूंपैकी एक होता जो तिन्ही फॉरमॅट खेळत. पीटरसन 2004 ते 2014 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. या काळात त्याने 104 कसोटी, 136 एकदिवसीय आणि 37 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीच्या 181 डावांमध्ये त्याने 47.28 च्या सरासरीने 8181 धावा केल्या. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांच्या 125 डावांमध्ये 40.73 च्या सरासरीने 4440 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 च्या 36 डावांमध्ये त्याने 37.93 च्या सरासरीने आणि 141.51 च्या स्ट्राईक रेटने 1176 धावा केल्या. (England’s former cricketer Kevin Pietersen is immersed in Rambhakti Surprised everyone by writing a post in Hindi)
हेही वाचा
भारतीय संघाचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ लवकरच संपेल, रवी शास्त्री यांनी केले भाकीत
रोहन बोपन्नाने रचला इतिहास; ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत मारली धडक, जागतिक क्रमवारीत बनला नंबर-1