न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ (ICC Women World Cup 2022) चा १५ वा सामना भारत विरुद्ध इंग्लंड (INDW vs ENGW) संघात झाला. बे ओव्हल स्टेडियम, माउंट माउंनगाई येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडपुढे पुरते गुडघे टेकले. फलंदाजीनंतर गोलंदाजीतील खराब प्रदर्शनामुळे भारतीय संघाने ४ विकेट्स राखून हा सामना गमावला आहे. हा भारतीय संघाचा विश्वचषकातील दुसरा पराभव आहे, तर इंग्लंडने त्यांचा पहिलावहिला विजय नोंदवला आहे.
या सामन्यात भारताच्या १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून कर्णधार हिथर नाइट हिने नाबाद ५३ धावांची खेळी केली. ७२ चेंडूंमध्ये ८ चौकारांच्या मदतीने तिने ही खेळी केली. तसेच नतालिया स्किव्हर हिने ४५ धावांचे योगदान दिले. तसेच ऍमी जोन्स आणि सोफिया डंकले यांनीही छोटेखानी पण उपयुक्त खेळी केल्या. ऍमीने १० धावा आणि सोफीने १७ धावा जोडल्या. परिणामी ३१.२ षटकातच ६ विकेट्सच्या नुकसानावर इंग्लंडने भारताचे आव्हान पूर्ण केले.
भारताकडून या डावात मेघना सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ७.२ षटके गोलंदाजी करताना २६ धावा देत तिने या विकेट्स घेतल्या. तसेच झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड आणि पूजा वस्त्राकार यांनीही इंग्लंडच्या प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
https://twitter.com/ICC/status/1503978523177984001?s=20
The future is now for Charlie Dean 🏃♀️
Meghna Singh India's new weapon 😎
Lapses in concentration cost India 📉
England's first points on board ⏫All the talking points from match 15 of #CWC22
— Women’s CricZone (@WomensCricZone) March 16, 2022
तत्पूर्वी भारताकडून एकही फलंदाज समानाधनकारक खेळी करू शकली नाही. सलामीवीर स्म्रीती मंधाना हिने सर्वाधिक ३५ धावा केल्या. यष्टीरक्षक रिचा घोष हिने ३३ तर झुलन गोस्वामी हिने २० धावा जोडल्या. कर्णधार मिताली राजसह भारताच्या ७ फलंदाज एकेरी धावेवर बाद झाल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांनी फक्त ३६.२ षटकातच भारतीय संघाला १३४ धावांवर सर्वबाद केले.
इंग्लंडकडून चार्लोट डिनने भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. तिने ८.२ षटके गोलंदाजी करताना २३ धावा देत भारताच्या ४ फलंदाजांना पव्हेलियनला धाडले. ऍनी श्रुबसोल हिनेही २ फलंदाजांना तंबूत धाडले.
अशाप्रकारे या एकतर्फी सामन्यात मोठा विजय मिळवत इंग्लंडने विश्वचषक २०२२ मधील त्यांच्या विजयाचे खाते उघडले आहे. तसेच सप्टेंबर २०२१ नंतर अर्थात ६ महिन्यांनंतर इंग्लंडने कोणता वनडे सामना जिंकला आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारत व इंग्लंडकडून कसोटी सामने खेळणारा ‘हा’ एकमेव क्रिकेटपटू माहित आहे का?
तमाम क्रिकेटप्रेमींच्या आठवणीतील दिवस: जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिनने केलं होतं ‘शतकांचं शतकं’