---Advertisement---

अंडर 19 विश्वचषकात झिम्बाब्वे 25 धावांवर ऑलआउट, इंग्लंडने घडवला इतिहास

On: रविवार, जानेवारी 15, 2023 10:38 PM
---Advertisement---

सध्या दक्षिण आफ्रिका येथे महिलांचा अंडर 19 टी20 विश्वचषक खेळला जात आहे. रविवारी विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध झिम्बाब्वे असा सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने झिम्बाब्वेवर 174 धावांनी  दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडने झिम्बाब्वेला केवळ 25 धावांवर बाद करत एक विश्वविक्रम प्रस्थापित केला.

 

पोचेस्ट्राम येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी केली. संघाच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच शानदार खेळ दाखवला. कर्णधार ग्रेस स्क्रिवन्स आणि लिबर्टी हीपने संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघींनी पहिल्या गड्यासाठी 60 धावांची भागीदारी केली. 25 धावा करून हीप बाद झाली. तर, ग्रेसने 45 धावा केल्या. निमाह हॉलंडने 37 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 59 धावा चोपल्या. पॉवेलीने 45 धावा करताना 26 चेंडूंचा सामना केला. यात सहा चौकार आणि एक षटकार लगावला. या सर्वांच्या योगदानामुळे इंग्लंडने 4 बाद 199 धावा उभारल्या.

इंग्लंडने उभारलेली धावसंख्या पाहता झिम्बाब्वेचा विजय कठीण वाटत होता. मात्र, ते या सामन्यात झुंज देखील देऊ शकले नाहीत.‌ झिम्बाब्वे संघाची एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकली नाही. अदेल जिमुनूने सर्वाधिक 5 धावा केल्या. ती नाबाद राहिली. तवननाईशा मारुमणीला चार धावा करता आल्या. कर्णधार केलिस एनधॉल्व तीन धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. तर, चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. अशा पद्धतीने त्यांचा संघ 12 षटकात 25 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून ग्रेस स्क्रिव्हन्सने चार षटकांत दोन धावा देत चार बळी घेतले. सोफिया स्मॅली आणि जोसी ग्रोव्हस यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले.

(England Womens Won By 174 Runs In U19 T20 World Cup Zimbabwe All Out On 25)

महत्वाच्या बातम्या-
एकदमच टॉपला! सध्या खेळत असलेल्या खेळाडूंत कोणीही नाही विराटच्या आसपास; पाहा ही आकडेवारी
INDvSL: शुबमन गिलच्या शतकाआधी युवराज सिंगने म्हटले, ‘क्रिकेट मरतय का?’; जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---