इंग्लंड संघाने तिसऱ्या म्हणजेच हेडिंग्ले कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन करत सामना आपल्या नावावर केला. हा सामना इंग्लंडने 3 विकेट्सने जिंकला. इंग्लंडने विजय मिळवला असला, तरीही ऑस्ट्रेलिया संघ ऍशेस 2023 मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ 2-1ने आघाडीवर आहे. दुसरीकडे, या मालिकेत एकापेक्षा जास्त विक्रमांची बरसात झाली. चला तर, ते कोणते विक्रम आहेत जाणून घेऊयात…
हेडिंग्ले कसोटी विक्रम
1. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात एकूण 18 षटकारांची बरसात झाली. ऍशेस मालिकेच्या इतिहासात असे पाचव्यांदा घडले, जेव्हा एका सामन्यात 18 किंवा त्याहून अधिक षटकार मारले गेले आहेत. ऍशेस सामन्यात सर्वाधिक षटकार 2013-14 हंगामात मारण्यात आले होते. यादरम्यान ऍडलेड कसोटीत दोन्ही संघांच्या फलंदाजांनी 21 षटकार मारले होते. याचवर्षी पर्थमध्येही दोन्ही संघांच्या फलंदाजांनी 19 षटकार मारले होते.
आणखी विक्रमांची बरसात
2. दुसरीकडे, बेन स्टोक्स (Ben Stokes) कसोटी इतिहासातील तिसरा कर्णधार बनला, ज्याच्या पहिल्या 17 कसोटी सामन्यातील सर्व सामन्यांचे निकाल लागले आहेत. आतापर्यंत स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने 12 सामने जिंकले आहेत, तर 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. याव्यतिरिक्त हेडिंग्ले मैदानात इंग्लंडने सलग पाचवा कसोटी सामना जिंकला आहे. इंग्लंड संघ 2018पासून सातत्याने या मैदानावर 5 कसोटी सामने जिंकला आहे. यासोबतच स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडने पाचव्यांदा कसोटी मालिकेत 250पेक्षा अधिक धावांचे आव्हान पार केले.
कर्णधार म्हणून एमएस धोनी, रिकी पाँटिंग आणि ब्रायन लारा यांनी अनुक्रमे 4 आणि प्रत्येकी 3 सामन्यात 250पेक्षा जास्त धावांचे आव्हान पार केले होते. स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडने 5पैकी 4 वेळा 4.50 किंवा त्याहून अधिकच्या रनरेटसोबत 250 किंवा त्याहून अधिक धावा करून सामना जिंकला आहे.
आणखा काय विक्रम रचले गेले?
3. हेडिंग्ले कसोटीत 6व्यांदा कोणत्याही संघाने कसोटी सामन्यात 250 धावांचे आव्हान पार केले. तसेच, सर्वाधिक वेळा 250 किंवा अधिक धावांचा पाठलाग मेलबर्न क्रिकेट मैदानावर करण्यात आला आहे. तसेच, सिडनी मैदानावर 4 वेळा संघांनी 250 किंवा त्याहून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.
4. इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 1000 धावा करणारा फलंदाज बनला. त्याने कसोटीत 1058 चेंडूंचा सामना करत वेगवान 1000 धावा केल्या. तसेच, डावानुसार पाहायचं झालं, तर ब्रूकने 17 डावात ही कामगिरी केली. तसेच, इंग्लंडसाठी सर्वात कमी डावात कसोटीत 1000 धावा करण्याचा विक्रम हरबर्ट सुटक्लिफे यांच्या नावावर आहे. त्यांनी अवघ्या 12 डावात 1000 धावांचा आकडा पार केला होता. (england won 3rd headingley test vs aus ashes 2023 know latest records)
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन असावी तर अशी! टी20त हॅट्रिक घेत हेलीने रचला विक्रम, आयर्लंडला धूळ चारत मालिका 3-0ने खिशात
नाद करा पण हरमनप्रीतचा कुठं! रोहितला पछाडत बनली ‘अशी’ कामगिरी करणारी पहिली भारतीय कर्णधार