लिड्स | मंगळवारी (१७ जुलै) लिड्स येथील भारता विरुद्धच्या तीसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला.
या विजयाबरोबर इंग्लंडने भारता विरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने खिशात घातली.
गेल्या दोन वर्षातील इंग्लंडचा हा मायदेशातील सलग सातवा एकदिवसीय मालिका विजय होता.
२०१६ ते २०१८ या काळात इंग्लंडने मायदेशात खेळलेल्या सर्व सातही एकदिवसीय मालिकेत विजय प्राप्त केला आहे.
इंग्लंडने प्रथमच इंग्लंडच्या भूमिवर सलग सात मालिका विजय प्राप्त करण्याची किमया साधली आहे.
मंगळवारी झालेल्या निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंड समोर २५७ धावांचे आव्हान उभे केले होते.
भारताचे हे आव्हान इंग्लंडने जो रुट नाबाद १०० आणि कर्णधार इयोन मॉर्गनच्या ८८ धावांच्या जिवावर दोन गडी गमावत ४४.३ षटकात पार केले.
असे आहेत इंग्लंडचे सलग सात एकदिवसीय मालिका विजय-
२०१६- श्रीलंकेवर ३-० ने विजय
२०१६- पाकिस्तानवर ४-१ ने विजय
२०१७- आयर्लंडवर २-० ने विजय
२०१७- दक्षिण आफ्रिकेवर २-१ ने विजय
२०१८- ऑस्ट्रेलियावर ५-० ने विजय
२०१८- भारतावर २-१ ने विजय
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला पराभूत करत इंग्लंडने जिंकली वनडे मालिका; मॉर्गन-रुटची जोडी ठरली विजयाची शिल्पकार
इंग्लंडकडून ही कामगिरी करणारा जो रुट ठरला पहिला फलंदाज