ऍशेस 2023 मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत ऑस्ट्रेलिया संघाने 2-0ने आघाडी घेतली होती. त्यानंतर मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने चौथ्या दिवशीच विजय मिळवत मालिकेत दमदार पुनरागमन केले. इंग्लंडच्या या विजयात हॅरी ब्रूक याच्या दुसऱ्या डावातील अर्धशतकाने सिंहाचा वाटा उचलला. या विजयासह इंग्लंडने मालिकेतील आव्हान कायम ठेवले. आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया 1-2 अशा स्थितीत आहेत.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय पहिल्या डावात योग्य ठरला होता. कारण, इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 263 धावांवर सर्वबाद केले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने 118 धावांची शतकी खेळी साकारली होती. ऑस्ट्रेलियाच्या या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्या डावात 237 धावांवर समाधान मानले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 26 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 224 धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लंडला विजयासाठी 251 धावांची गरज होती. इंग्लंडने हे आव्हान 3 गडी राखून पार केले आणि सामना जिंकला.
???????????????????????????? ENGLAND WIN! ????????????????????????????
Must win. Did win!
COME ON! ???? #EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/x9VfxLRRbU
— England Cricket (@englandcricket) July 9, 2023
इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात ब्रूक चमकला
ऑस्ट्रेलियाच्या 251 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून दुसऱ्या डावात हॅरी ब्रूक (Harry Brook) याने चमकदार कामगिरी केली. त्याने यावेळी अर्धशतक झळकावले. त्याने 93 चेंडूंचा सामना करताना 75 धावा केल्या. यामध्ये 9 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर झॅक क्राऊले (44), ख्रिस वोक्स (नाबाद 32), बेन डकेट (23), जो रूट (21) यांनाच 20 धावांचा आकडा पार करता आला. विशेष म्हणजे, मार्क वूड याने 8 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांच्या मदतीने नाबाद 16 धावा करत संघाचा विजय सोपा केला. कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) फक्त 13 धावांवर बाद झाला होता.
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने भेदक गोलंदाजी करत सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने यावेळी 16 षटके गोलंदाजी करताना 78 धावा खर्चून 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
ट्रेविस हेडचे शानदार अर्धशतक
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ट्रेविस हेड चमकला. त्याने 112 चेंडूत 77 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. यामध्ये 3 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर उस्मान ख्वाजा (43), मार्नस लॅब्यूशेन (33), आणि मिचेल मार्श (28) यांनीच खास प्रदर्शन केले. याव्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही. कर्णधार कमिन्स यावेळी फक्त 1 धाव करून बाद झाला.
यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी करताना स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच, मार्क वूड आणि मोईन अली यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या.
पहिल्या डावाचा आढावा
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 264 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून फलंदाजी करताना कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला होता. त्याने यावेळी 108 चेंडूंचा सामना करताना 80 धावा केल्या होत्या. यामध्ये 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त झॅक क्राऊले (33), मार्क वूड (24) आणि मोईन अली (21) यांनीच 20 धावांचा आकडा पार केला. त्यांच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज खास प्रदर्शन करू शकला नाही.
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स याने शानदार गोलंदाजीचा नजारा दाखवला. त्याने 18 षटके गोलंदाजी करताना 91 धावा खर्चून सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, मिचेल स्टार्क याने 2, तर मिचेल मार्श आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श याने लाजवाब खेळी साकारली. त्याने 118 चेंडूंचा सामना करताना 118 धावा केल्या होत्या. यामध्ये 4 षटकार आणि 17 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त ट्रेविस हेड (39), स्टीव्ह स्मिथ (22) आणि मार्नस लॅब्यूशेन (21) यांनी संघाच्या धावसंख्येत हातभार लावला होता.
यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी करताना मार्क वूड (Mark Wood) याने चेंडूतून आग ओकत सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 11.4 षटके गोलंदाजी करताना 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त ख्रिस वोक्स याने 3, तर स्टुअर्ट ब्रॉड याने 2 विकेट्स नावावर केल्या होत्या. (England won by 3 wickets in headingley 3rd test ashes 2023)
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंका बनली क्वालिफायर्स चॅम्पियन! अंतिम सामन्यात उडवला नेदरलँड्सचा खुर्दा
‘विराट FAB 4चा भाग नाही, बाबरचे नाव जोडा…’, माजी भारतीय क्रिकेटपटूचे खळबळजनक विधान