नाॅटिंगघम | भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात भारतीय संघाने मुरली विजयच्या जागी शिखर धवनला, दिनेश कार्तिकच्या जागी रिभष पंतला तर कुलदीप यादवच्या जागी जसप्रित बुमराहला संधी देण्यात आली आहे.
शिखरचा हा मालिकेतील दुसरा सामना असुन त्याला दुसऱ्या कसोटीत वगळण्यात आले होते तर खराब फाॅर्ममध्ये असलेल्या यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या जागी रिभष पंत पदार्पण करत आहे.
फिरकीपटू कुलदीप यादवच्या जागी जसप्रित बुमराहला संधी देण्यात आली आहे. त्याचा या मालिकेतील पहिलाच सामना आहे.
इंग्लंड संघाने दुसऱ्या कसोटीतील संघात एकच बदल केला असुन सॅम करनच्या जागी बेन स्टोक्स खेळणार आहे.
असा आहे ११ जणांचा संघ:
भारत: विराट कोहली(कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन,जसप्रित बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी.
Here's our Playing XI for the 3rd Test. pic.twitter.com/TbgCCrtakP
— BCCI (@BCCI) August 18, 2018
इंग्लंड: अँलिस्टर कुक, केटॉन जेनिंग्स, जो रूट (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेअस्ट्रो, जॉश बटलर, ख्रिस वोक्स, बेन स्टोक्स, आदिल राशिद, जेम्स अॅंडरसन, स्टुअर्ट ब्रॉड.
ENG XI: A Cook, K Jennings, J Root, O Pope, J Bairstow, B Stokes, J Buttler, C Woakes, A Rashid, S Broad, J Anderson
— BCCI (@BCCI) August 18, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार
–एशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर