भारत विरुद्ध इंग्लंड संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 29वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअम येथे पार पडणार आहे. रविवारी (दि. 29 ऑक्टोबर) या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अशात भारतीय संघ या विश्वचषकात पहिल्यांदाच धावांचा बचाव करताना दिसेल. यापूर्वीचे सर्व सामने भारताने आव्हानाचा पाठलाग करताना जिंकले आहेत.
या सामन्यात इंग्लंड संघाने कोणताही बदल केला नाही. ते या सामन्यातही मागील प्लेइंग इलेव्हनसोबतच उतरणार आहे. दुसरीकडे, भारतीय संघातही कोणताच बदल नाहीये.
स्पर्धेतील कामगिरी
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील उभय संघांची कामगिरी पाहायची झाली, तर स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघ सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यात एकही पराभव पत्करला नाहीये. त्यामुळे 10 गुणांसह भारत पॉईंट्स टेबलमध्येही दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, इंग्लंड संघाने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यात फक्त 1 विजय मिळवला आहे. तसेच, उर्वरित 4 सामन्यात पराभव पत्करला आहे. ते पॉईंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानी आहेत.
भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला 8 विकेट्सने, तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला 7 विकेट्सने, चौथ्या सामन्यात बांगलादेशला 7 विकेट्सने आणि पाचव्या सामन्यात न्यूझीलंडला 4 विकेट्सने पराभूत केले. भारताने हे सर्व सामने आव्हानाचा पाठलाग करताना जिंकले. दुसरीकडे, इंग्लंडने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 9 विकेट्सने पराभव पत्करला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध 137 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर पुढील तिन्ही सामन्यात पराभव पत्करला. तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानकडून 69 धावांनी, दक्षिण आफ्रिकेकडून चौथ्या सामन्यात 229 धावांनी आणि पाचव्या सामन्यात श्रीलंकेकडून 8 विकेट्सने पराभव पत्करला. (England won the toss and opted to bowl first against India cwc 23)
स्पर्धेतील 29व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
इंग्लंड
जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वूड
हेही वाचा-
हारलेल्या सामन्यातही न्यूझीलंडने घडवला इतिहास! विश्वचषकात ‘असा’ जबरदस्त पराक्रम करणारा पहिलाच संघ
‘तमीम इक्बालसोबतच्या वादामुळेच संघ…’, बांगलादेशी कर्णधाराचं धक्कादायक विधान