इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस कसोटी मालिका रंगात आली आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात इंग्लंडला पराभवाची धूळ चारल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना हेडिंग्लेमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपला 15 सदस्यीय संघ घोषित केला आहे, ज्यामध्ये काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले.
हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा केली, त्यामध्ये रेहान अहमद आणि मॅटी पॉट्स याची नावे वगळली गेले आहेत. इंग्लंडचा दिग्गज फिरकीपटू मोईन अली () याला मालिकेतील दुसऱ्या कसोटीपूर्वी दुखापत झाली होती. याच पार्श्वभूमीवर अहमदला मोईनच्या जागी संघात सामील केले गेले होते. पण आता हेडिंग्ले कसोटीपूर्वी त्याला पुन्हा संघातून बाहेर केले गेले आहे. असात मोईन अलीने पुन्हा फिटनेस मिळवल्याचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे.
इंग्लंडसाठी वरच्या फळीत खेळणारा ओली पोप देखील दुखापतग्रस्त आहे. लॉर्ड्स कसोटीत त्याला उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. निवडकर्ते आशा करत आहेत की, 25 वर्षीय पोप तिसऱ्या कसोटीसाठी फिट असेल. पण जर असे झाले नाही आणि पोपने माघार घेतली, तर डॅन लॉरेंसला खेळण्याची संधी मिळू शकते. दुसरीकडे मॅटी पॉट्सच्या जागी क्रिस वोक्स किंवा मार्क वुड यायंना अंतिम 11 खेळाडूंमध्ये निवडले जाऊ शकते.
हेडिंग्ले कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा 15 सदस्यीय संघ –
बेन स्टोक्स (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेंस, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट, जोश टोंग, क्रिस वोक्स, मार्क वुड.
दरम्यान, ऍशेस 2023मध्ये सध्या यजमान इंग्लंडच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन संघाचे पारडे जड दिसत आहे. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडला अनुक्रमे 2 विकेट्स आणि 43 धावांनी पराभव स्वीकारावा लागाल आहे. उभय संघातील हेडिंग्ले कसोटी सामना 6 ते 11 जून दरम्यान खेळला जाईल. (England’s 15-man squad for the Headingley Test announced)
महत्वाच्या बातम्या –
Ashes 2023 । प्रमुख खेळाडूचा पत्ता कट! शेवटच्या तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियान संघाची घोषणा
लॉर्ड्सच्या लॉंग रूममध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंना धक्काबुक्की, एमसीसीने केली तडक कारवाई