सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये 3 भारतीय खेळाडू टाॅप-10 मध्ये समाविष्ट आहेत. 5व्या स्थानी रोहित शर्मा (Rohit Sharma), 6व्या स्थानी यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), तर 7व्या स्थानी दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आहे. पण पहिल्या स्थानी इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट आहे. सध्या रूट ज्या फाॅर्ममध्ये आहे, त्यावरून असे बोलले जात आहे, की तो महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे कसोटीमधील सर्वाधिक धावांचे रेकाॅर्ड मोडीत काढेल. या बातमीद्वारे आपण रूट आणि तेंडुलकरमधील धावांच्या समीकरणाबद्दल जाणून घेऊया.
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट (Joe Root) उत्कृष्ट फाॅर्ममध्ये आहे. त्याने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली. रूटने श्रीलंकेविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर लागोपाठ दोन्ही डावांत शतके झळकावली. इंग्लंड संघाने ही मालिका 2-1ने जिंकली. या मालिकेत रूटने 3 सामन्यांच्या 6 डावात 75च्या सरासरीने सर्वाधिक 375 धावा केल्या.
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) कसोटीमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तेंडुलकरने 200 कसोटी सामन्यांमध्ये 53.78च्या सरासरीने 15,921 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 51 शतके झळकावली आहेत, तर 68 अर्धशतके झळकावली आहेत. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 248 आहे.
रुटने 146 कसोटी सामन्याच्या 267 डावांमध्ये 12,402 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 50.62 राहिली आहे. कसोटीमध्ये त्याने 34 शतके आणि 64 अर्धशतके केली आहेत. रुटबद्दल असे बोलले जात आहे की, काही वर्षे तो याच अंदाजात खेळत राहिला तर तो तेंडुलकरचा रेकाॅर्ड मोडेल. तो सचिनपासून 3,519 धावा दूर आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की रूट हा रेकाॅर्ड मोडू शकेल का? हा रेकाॅर्ड मोडायला रूट पुढे गेला तर किती वेळ लागेल?
सचिनचे सर्वाधिक धावांचे रेकाॅर्ड मोडण्यासाठी जो रूटसाठी असे असणार समीकरण- 1) जर रूटने आगामी सामन्यांमध्ये प्रति डाव 53 धावा केल्या तर तो 3 वर्षात (सप्टेंबर 2027) सचिनच्या पुढे जाईल. यासाठी त्याला 66 डाव खेळावे लागतील.
2) जर रूटने प्रति डाव 50 धावा केल्या तर तो तेंडुलकरला 3 वर्षे 3 महिन्यांनी मागे सोडेल (डिसेंबर 2027). अशा स्थितीत त्याला 70 डाव खेळावे लागतील.
3) जर रूटने प्रति डाव 45 धावा केल्या तर त्याला 3.5 वर्षे लागतील (मार्च 2028). यासाठी त्याला 78 डावात फलंदाजी करावी लागेल.
4) जर रूटने प्रति डाव 40 धावा केल्या तर तो 4 वर्षात (सप्टेंबर 2028) सचिनपेक्षा पुढे असेल. यासाठी त्याला 88 डावात फलंदाजी करावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ स्टार खेळाडू होणार निलंबित? मोठे कारण समोर
जेतेपद गमावले, तरीही छप्परतोड कमाई; वनडे विश्वचषक 2023 नंतर भारताने कमावले 11 हजार कोटी
‘हा’ खेळाडू धोनीपेक्षा उत्कृष्ट, दिग्गजाने स्पष्टच सांगितले