आगामी भारतीय संघ घरच्या मैदानावर बांगलादेशसोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही सामने चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. अनेक युवा खेळाडूंना या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गज खेळाडू रिकी पाॅन्टिंगने रिषभ पंत आणि एमएस धोनीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) रिषभ पंतचे (Rishabh Pant) कौतुक केले आणि म्हटले की तो गंभीरपणे खेळतो आणि प्रत्येक वेळी मैदानावर आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतो. पाॅन्टिंग म्हणाला, “पंत एक प्रभावी क्रिकेटपटू आहे. त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 4 किंवा 5 कसोटी शतके झळकावली आहेत आणि त्याला त्याची खेळण्याची पद्धत आवडते. धोनीने त्याच्या कारकीर्दीत 90 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने फक्त 6 शतके झळकावली. पंतने आतापर्यंत 5 शतके झळकावली आहेत.”
डिसेंबर 2022 मध्ये पंतचा भीषण अपघात झाला होता. अनेक ठिकाणी गंभीर दुखापतींमुळे पंतला दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. यावर पाँटिंग म्हणाला, “एवढी गंभीर दुखापत झाल्यानंतरही असे पुनरागमन करणे अविश्वसनीय आहे. जर तुम्ही त्याचा पाय आणि त्याने ज्या पद्धतीने त्याच्या अपघाताविषयी माहिती दिली ते पाहिल्यास, हे सर्व ऐकल्यानंतर मला वाटले नव्हते की तो आयपीएल 2024 मध्ये खेळू शकेल.”
रिषभ पंतच्या (Rishabh Pant) कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 2018 मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 33 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 43.67च्या सरासरीने फलंदाजी करताना 2,271 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 11 अर्धशतकांसह 5 शतके झळकावली आहेत. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 159 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
21व्या वर्षी 150च्या वेगाने गोलंदाजी.. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजापासून भारतीय फलंदाजाना राहावं लागेल सावध!
आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज
ICC Test Ranking: 3 वर्षांनंतर रोहित शर्माची टाॅप-5 मध्ये एँट्री, कोहली कितव्या स्थानी?