सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड या संघामध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. इंग्लंडचा संघ तब्बल 17 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी खेळण्यासाठी उतरला आहे. इंग्लंडचे काही खेळाडू आजारी असल्याने पहिला कसोटी सामना पुढे ढकलण्याची चर्चा सुरु होती. मात्र, रावळपिंडी येथे खेळवला जाणारा सामना पूर्वनियोजित दिवशी खेळवला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामीवीरांनी हा निर्णय योग्य ठरवला. पहिल्या सामन्याच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या फंलदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पाकिस्तानचे गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांसमोर अक्षरश: हतबल झालेले बघायला मिळाले.
पहिल्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्स याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 34 षटकांअखेर बिनबाद 219 धावा केल्या. दोनही सलामीवीर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. जॅक क्रॉले याने 106 चेंडूत 21 चौकरांच्या मदतीने 120 धावा केल्या होत्या, तर बेन डकेट हा 103 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 96 धावांवर खेळत होता. शतक झळकावल्यानंतर दोन्ही फंलदाज बाद झाले.
स्टोक्सला काही दिवसांपूर्वी कसोटी संघाचे कर्णधारपद मिळाले, तेव्हापासून संघाची कसोटी सामना खेळण्याची पद्धतच बदलली. सध्याचे इंग्लंडचे प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचे माजी कर्णधार ब्रॅंडन मॅक्क्युलम स्वत: एक आक्रमक फलंदाज आहेत. याचा परिणाम संघावर देखील बघायला मिळतो. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने पहिल्या सत्रात एकूण 5 गोलंदाजांचा वापर केला, मात्र कोणताही गोलंदाज त्याला यश मिळवून देऊ शकला नाही.
या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या दोनही सलामीवारांनी शतकीय डाव खेळला. जॅक क्रॉली 122 धावा करुन बाद झाला तर बेन डकेट हा 107 धावा करत तंबूत परतला. याआधी देखील इंग्लंडच्या सलामीवीरांनी हा कारनामा करुन दाखवला होता. 2013मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडतर्फे ऍलिस्टर कुक (116) आणि निक कॉम्पटन (117) धावा करत संघालाा चांगली सुरुवात करुन दिली होती.(England’s both openers made centuries)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे, त्या दोघांना वनडेमध्येच सातत्याने खेळवा! भारताच्या दिग्गजाचे श्रेयस अय्यर-वॉशिंग्टन सुंदरबाबत वक्तव्य
AUSvWI: शतक करताच स्टीव्ह स्मिथने केली ब्रॅडमन यांची बरोबरी, विराट कोहली घसरला तिसऱ्या स्थानी