---Advertisement---

मोठी बातमी! अँड्र्यू फ्लिंटॉफच्या कारचा भीषण अपघात! हवाई मार्गाने रुग्णालयात दाखल

On: बुधवार, डिसेंबर 14, 2022 11:00 AM
Andrew Flintoff
---Advertisement---

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफ या एक भयंकर अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. अपघातानंतर त्याला हवाई मार्गाने रुग्णालयात पोहोचवले गेले. बीसीसीचा कायर्यक्रम ‘टॉप गीयर’ साठी शूट करत असताना सोमवारी (12 डिसेंबर) हा अपघात झाल्याचे समोर येत आहे. त्याच्या आरोग्याविषयी अद्याप कुठली ढोस माहिती समोर आल्याचे दिसत नाही.

सोमवारी अँड्र्यू फ्टिंटॉफ (Andrew Flintoff) बीसीबीच्या टॉप गीयर (Top Gear) कार्यक्रमासाठी सरेमधील एयरोड्रोम याठिकाणी शुटिंग करत होता, ज्याठिकाणचे वातावरण थंड आणि हर्फाळ असते. याच वेळी गाडी चालवताना त्याचा अपघात झाला आहे. फ्लिंटॉफच्या अपघातानंतर बीसीसीकडून याविषयी माहिती दिली गेली आहे. “टॉप गीअर टेस्ट ट्रॅकवर सोमवारी सकाळी फ्लिंटॉफचा एक अपघात झाला. यानंतर आमचे कर्मचारी आणि मेडिकल टीम यांनी तत्काळ त्याची तपासणी केली. पुढच्या उपचारांसाठी त्याला रुग्णालयात नेले गेले आहे,” अशी माहिती बीसीसीकडून दिली गेली आहे.

फ्लिंटॉफच्या तंदुरुस्तीविषयी अद्याप कुठलीही ठोस माहिती जरी आली असली, तरी काही माध्यमांमध्ये त्याची दुखापत गंभीर नसल्याचेही सांगितले जात आहे. ‘द सन’ने दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर झालेली दुखापत जीवघेणी नाहीये. कारण त्याची गाडी जास्त वेगात नव्हती, तो सामान्य वेगानेच गाडी चालवत होता. यापूर्वी 2019 मध्येही टॉप गीअरच्या एका भागाची शुटिंग करताना फ्लिंटॉफचा अपघात झाला होता.

फ्लिंटॉफची आंतरराष्ट्रीय कारकिर्द मोठी आणि काही प्रमाणात वादग्रस्त देखील राहिली. त्याने आयसीसी टी-20 विश्वचषक 2007 मध्ये भारताचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग याला धमकावण्याचा प्रयत्न केला होता. युवराजने याविषयी माहिती देताना सांगितले होते की, “त्याने मला गळा कापण्याची धमकी दिली होती.” उभय़ संघांतील याच सामन्यात युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉड याच्या एका षटकात लागोपाठ सहा षटकार मारून विश्वविक्रम केला होता.

त्याच्या कारकिर्दीचा एकंदरीत विचार केला, तर त्याने एकूण 79 कसोटी, 141 वनडे आणि 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याच वर्षी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी दिग्गज अँड्र्यू सायमंड्स याच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात सायमंड्सने अखेरचा श्वास घेतला. (England’s former Captain Andrew Flintoff’s serious car crash)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs BAN | पहिल्या कसोटीत भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, ‘अशी’ आहे केएल राहुलची प्लेइंग इलेव्हन
प्रो कबड्डी: टायब्रेकरमध्ये विजय मिळवत थलायवाज उपांत्य फेरीत; बेंगलोरनेही मारली बाजी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---