भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी इंग्लंड संघ व्यवस्थापन आपल्या प्लेइंग इलेव्हनची निवड करत असते. यावेळीही अगदी तसेच करत गुरुवारी (1 जानेवारी) विशाखापट्टणम कसोटीसाठी इंग्लंडचा 11 सदस्यीय संघ घोषित झाला. यात एक पदार्पणवीर, तर एका दिग्गजाचे संघात पुनरागमन झाले.
इंग्लंडचा दिग्गज फिरकीपटू जॅक लीच (Jack Leach) दुसऱ्या कसोटी सामन्याआधी दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला. कर्णधार बेन स्टोक्स याने लीचच्या दुखापतीची माहिती माध्यमांना दिली होती. गुरुवारी दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन समोर आल्यानंतर संघात दोन महत्वाचे बदल पाहायला मिळाले. युवा फिरकीपटू शोएब बशीर आणि दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांना संघात सामील करण्यात आले आहे.
– 2006 Test tour.
– 2008 Test tour.
– 2012 Test tour.
– 2016 Test tour.
– 2021 Test tour.
– 2024 Test tour.James Anderson will be playing his 6th Test tour in India tomorrow – The ???? of England. pic.twitter.com/LsOcDPaHRz
— Johns. (@CricCrazyJohns) February 1, 2024
जेम्स अँडरसन भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. त्याच्या जागी मार्क वुड याला खेळण्याची संधी मिळाली होती. पण दुसऱ्या कसोटीसाठी संघ व्यवस्थापनाने अँडरसनला पुन्हा एकदा संघात घेतले आहे.
???? JIMMY ANDERSON IS BACK FOR ENGLAND IN THE 2ND TEST….!!! ???? pic.twitter.com/Lq3l6pv6ig
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 1, 2024
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन –
झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (C), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
(England’s playing eleven announced for the second Test match against India)
महत्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: एक हात मोडला असताना ग्रॅमी स्मिथ आला मैदानात, पुढे काय झाले पाहाच!
दुसऱ्या कसोटीतून इंग्लंडचा सर्वात यशस्वी खेळाडू बाहेर! बेन स्टोक्सलाही बसला धक्का






