भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारी (25 जानेवारी) सुरू होणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन घोषित केले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात इंग्लंडने जास्तीत जास्त फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. दुसरीकडे दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला संघातून वगळण्यात आले आहे.
गुरुवारी (25 जानेवारी) होणाऱ्या या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधीच इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन घोषित केली. त्यांनी आपल्या संघात तीन फिरकी, तर एक वेगवान गोलंदाज सामील केला आहे. यात लंकाशायर काउंटी संघाचा टॉम हार्टली याला कसोटी पदार्पणाची संधी या सामन्यातून मिळाली आहे. इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मार्क वुड हा एकमत्र वेगवान गोलंदाज आहे. जॅक लीज, टॉम हार्टली आणि रेहान अहमद या फिरकी गोलंदाजांनी संधी दिली गेली आहे. इंग्लंडचा युवा शोएब बशीर संघात निवडण्यासाठी उपलब्ध नव्हता. तो अबुधावीमध्ये संघासोबत होता. पण वीजा न मिळाल्यामुळे तो भारतात पोहोचू शकला नाही.
मागच्या वर्षी ऍशेस मालिकेत जेम्स अँडरसन (James Anderson) भारतीय संघाचा भाग होता. पण मालिकेत त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. अशातच आता भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून त्याला वगळण्यात आले आहे. भारतीय खेळपट्टी नेहमीच फिरकी गोलंदाजांना फायदेशीर राहिली आहे. हैदराबादमध्येही फिरकीपटू आपल्या गोलंदाजीच्या जोरावर शामन्याचा निकाल ठरवताना दिसू शकतात. इंग्लंड संघाने हीच गोष्ट लक्षात घेऊन ही प्लेइंग इलेव्हन निवडल्याचे दिसते.
नुकताच हॅरी ब्रुक भारत दौऱ्यातून बाहेर पडला. वैयक्तिक कारणास्तव त्याने हा निर्णय घेतला असून संघासाठी ही एक डोकेदुखी ठरली. ब्रुकच्या जागीर डॅन लॉरेंस याला संघात सामील केले गेले. पण पहिल्या कसोटीत लॉरेंसलाही संधी दिली गेली नाहीये. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स देखील पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करणार नाहीये. त्याच्या डाव्या गुडघ्याची नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. फिटनेसच्या कारणास्तव तो हैदराबादमध्ये गोलंदाजी करताना दिसणार नाही. (England’s playing XI for the first Test match against India)
भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन –
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर) , बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जॅक लीच.
महत्वाच्या बातम्या –
भारताला विश्व चॅम्पियन बनवणारे शिलेदारच टीम इंडियाला नडणार, ‘या’ देशाकडून खेळणार टी20 विश्वचषक 2024
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन रामभक्तीत तल्लीन! हिंदीत पोस्ट लिहून सर्वांना केले चकित