India vs England 2nd Test: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय संघाच्या फलंदाजांनंतर आता वेगवान गोलंदाजही आग ओकत आहेत. या सामन्यात व्यवस्थापनाने जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजाला विश्रांती दिली असली तरी, अजूनपर्यंत संघाला त्याची उणीव जाणवलेली नाही. एजबॅस्टनमध्ये आकाशदीप आणि मोहम्मद सिराजच्या जोडीने इंग्लंडविरुद्ध भेदक गोलंदाजी करत इंग्लिश संघाला बॅकफूटवर ढकलले आहे. यासोबतच इंग्लंडच्या फलंदाजांच्या नावावर एक लाजिरवाणा रेकाॅर्डही नोंदवला गेला आहे. यापूर्वी 2010 मध्ये असे घडले होते आणि आता भारतीय संघाने ही कमाल करून दाखवली आहे.
बर्मिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडचे टॉप 6 फलंदाजांपैकी काही फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत. 2010 नंतर असे पहिल्यांदाच घडले आहे. शेवटच्या वेळी पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडचे टॉप 6 फलंदाजांपैकी काही फलंदाज शून्यावर बाद झाले होते. जॅक क्रॉली, ओली पोप आणि कर्णधार बेन स्टोक्स एकही धाव काढू शकले नाहीत. (Zak Crawley Ollie Pope Ben Stokes duck) जॅक क्रॉली आणि ओली पोपला आकाशदीपने सलग चेंडूंवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर तिसऱ्या दिवशी सिराजने धारदार गोलंदाजी करत स्टोक्सला शून्यावरच बाद केले. (England top 6 ducks Test)
भारतीय संघाने जसप्रीत बुमराहला या सामन्यात वर्कलोड व्यवस्थापनासाठी विश्रांती दिली, तेव्हा प्रत्येकाने याला विरोध केला. परंतु इतर गोलंदाजांनी संघाला त्याची जास्त उणीव भासू दिली नाही. पहिल्या डावाच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांनी रंग भरायला सुरुवात केली आणि इंग्लंडचे फलंदाज बॅकफूटवर दिसले. (England batting collapse Test)
भारतीय संघ आजपर्यंत एजबॅस्टनच्या मैदानावर कोणताही कसोटी सामना जिंकू शकलेली नाही. या मैदानावर इंग्लंडचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. ज्या पद्धतीने भारतीय खेळाडूंनी या सामन्यात प्रदर्शन केले आहे, भारतीय संघ विजय मिळवू शकते. जर संघाने हा सामना जिंकला, तर मालिका 1-1 च्या बरोबरीवर येईल. यानंतर लॉर्ड्सच्या मैदानावर होणारा सामना महत्त्वाचा ठरेल.
MOHAMMADN SIRAJ IS BOSSING AT EDGBASTON – WHAT A BOWLER. ????pic.twitter.com/FEmud9230v
— Tanuj (@ImTanujSingh) July 4, 2025






