---Advertisement---

संघाला दुहेरी धक्का! चॅम्पियन्स ट्राॅफीतून बाहेर पडला ‘हा’ स्टार खेळाडू

---Advertisement---

सध्या भारत विरूद्ध इंग्लड (India vs England) संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी (ICC Champions Trophy 2025) इंग्लंडला दुहेरी धक्का बसला आहे. इंग्लड संघाला भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आणि आता बातमी आली आहे की युवा प्रतिभावान खेळाडू जॅकब बेथेल (Jacob Bethell) 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) स्वतः याची पुष्टी केली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने अद्याप जेकब बेथेलच्या जागी कोणाचीही घोषणा केली नाही. तथापि, भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी बेथेलचा कव्हर म्हणून टॉम बँटनला बोलावण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी बेथेलची जागा बॅंटन घेईल. बोर्डाने अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या जागी कोण आहे? याची घोषणा केलेली नाही.

21वर्षीय जॅकब बेथेलने (Jacob Bethell) भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले आणि गोलंदाजीतही 1 विकेट घेतली. यानंतर, दुखापतीमुळे तो दुसऱ्या  सामन्यात खेळला नाही. दुसऱ्या वनडे सामन्यातील पराभवानंतर जोस बटलरने (Jos Buttler) सांगितले की बेथेल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही.

उद्या (11 फेब्रुवारी 2025) पर्यंत, सर्व संघ आयसीसीच्या परवानगीशिवाय त्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात बदल करू शकतात. अशा परिस्थितीत, इंग्लंड मंगळवारी (11 फेब्रवारी) जॅकब बेथेलच्या जागी कोणत्या खेळाडूची घोषणा करेल हे पाहणेदेखील महत्वाचे ठरेल. बेथेलच्या जागी अष्टपैलू सॅम करनला (Sam Curran) संघात स्थान मिळू शकते असे मानले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

तिरंगी मालिकेत किवींचे वर्चस्व! दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरी गाठली
क्रिकेट इतिहासात नवा अध्याय! या खेळाडूनं पहिल्याच वनडेत गाठला अनोखा टप्पा
‘सामन्याच्या जोशात जीवनाची किंमत’, अहमदाबाद वनडेत BCCI राबवणार अनोखा उपक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---