एका प्रसिद्ध महिला कमेंटेटरनं भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. बुमराह सध्या क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात त्यानं 5 बळी मिळवले. दरम्यान एका महिला कमेंटेटरनं बुमराहसाठी ‘प्राइमेट’ हा शब्द वापरला, ज्याचा मराठीत अर्थ ‘माकड’ असा होतो. तिच्या या टिप्पणीमुळे बऱ्याच वर्षांपूर्वी गाजलेला ‘मंकी गेट स्कँडल’ पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
झालं असं की, ब्रिस्बेन कसोटीत बुमराहनं दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 2 विकेट घेतल्या होत्या. तेव्हा ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रेट लीनं त्याचं खूप कौतुक केलं. त्यानंतर इंग्लिश समालोचक इसा गुहा ही असं काहीतरी बोलली, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ती म्हणाली, “बुमराह हा संघाचा MVP आहे. मोस्ट व्हॅल्युएबल प्राइमेट जसप्रीत बुमराह.”
तिच्या या वक्तव्यावरून वाद उफाळल्यानंतर गुहानं माफी मागितली आहे. जसप्रीत बुमराहला आदर देणं हेच तिचं उद्दिष्ट असल्याचं ती म्हणाली. इसा गुहा माफी मागताना म्हणाली, “मी काल माझ्या कॉमेंट्री दरम्यान एक शब्द वापरला होता, ज्याचे हजारो अर्थ असू शकतात. माझ्या कमेंटमुळे दुखावलेल्या कोणाचीही मला माफी मागायची आहे. मी इतरांचा खूप आदर करते.”
‘प्राइमेट’ या शब्दाचा अर्थ मोठा मेंदू असलेला नरवानर असा होतो. पण ते वादाचं कारण बनलं कारण यामुळे 2008 मध्ये झालेल्या ‘मंकीगेट स्कँडल’च्या आठवणींना उजाळा मिळाला. वास्तविक, 2008 मध्ये सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळला जात होता. त्यावेळी भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगवर अँड्र्यू सायमंड्सला ‘माकड’ म्हटल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हरभजन सिंगला तीन सामन्यांसाठी निलंबितही करण्यात आलं होतं.
इसा गुहानं जसप्रीत बुमराहबाबत ही टीप्पणी करताच लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. इसा असं काही बोलू शकते यावर काही लोकांचा विश्वास बसला नाही, तर काही लोकांनी अशा कमेंट्समुळे तिची कारकीर्द संपुष्टात येईल असा दावाही केला.
हेही वाचा –
IND vs AUS; भारतीय गोलंदाज कुठे कमी पडले? गोलंदाजी प्रशिक्षकाने केला खुलासा
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शाकिब अल हसनवर घातली बंदी, नेमकं प्रकरण काय?
SMAT Final 2024; फायनलमध्ये मध्य प्रदेशला चारली धूळ, मुंबईने पटकावले विजेतेपद