इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. यादरम्यानच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. त्याच्या ‘द टॅप अँड रन’ या पबला आग लागली. यामध्ये त्याचे पब जळून खाक झाले. यामुळे ब्रॉडही भावूक झाला. त्याने याबाबत ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. (Stuart Broad Pub Fire)
स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Braod) याने या घटनेबद्दल एक ट्वीट करत म्हणले की, “मला आज सकाळच्या या बातमीवर विश्वासच बसला नाही. खरंतर, मला अजूनही विश्वास होत नाहीये की, आमच्या शानदार पब ‘द टॅप अँड रन’ला पहाटे आग लागली. बर झालं की, कोणाला काही दुखापत झाली नाही, नॉटिंघमशायर अग्निशमन दल आपल्या प्रयत्नांमध्ये अविश्वसनीय होती. तसेच, स्थानिकांच्या समर्थनासाठी धन्यवाद आणि त्रासासाठी खेद आहे.”
I couldn’t believe the news this morning. Not sure I still can.
Our wonderful Pub @tapandruncw caught fire in the early hours.
Thankfully no one was hurt, the Nottinghamshire Fire Service were incredible in their efforts & thank you to the villagers for the wonderful support & pic.twitter.com/tVH8ivOvmy— Stuart Broad (@StuartBroad8) June 11, 2022
पुढे बोलताना ब्रॉड म्हणाला की, “आज आमच्या उत्कृष्ट कर्मचार्यांचा विचार करून, तेथील प्रत्येक व्यक्तीने समुदायासाठी एक खास पब तयार केला आहे. सध्या त्रास होत आहे, पण आपण पुन्हा उभे राहू.”
Support & sorry for the disruption.
Thinking of our awesome staff today, every single person there has created a special pub for the community. It hurts right now but we will come out the other side @gurneyhf @AvrilGurney pic.twitter.com/vEgFPby1zI— Stuart Broad (@StuartBroad8) June 11, 2022
विशेष म्हणजे ब्रॉड आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी हे दोघे या पबचे सह-मालक आहेत. हॅरी गर्नी हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून देखील खेळला आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी पहाटे सुमारे ३:२० वाजता घटनास्थळावर पोहोचले. सुत्रांच्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना ८ तास लागले.
हे पब नॉटिंघमशायर आणि लीसेस्टरशायर शहरांच्या सीमेवर स्थित आहे. यामध्ये नुकसान होऊनही या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या दरम्यान, अनुभवी वेगवान गती गोलंदाजाने न्यूझीलंडविरुद्ध चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १०७ रन देऊन २ गडी बाद केले आहेत. त्याने काईल जेमिसन आणि टिम साऊदी यांना बाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कर्णधारपद सोड आणि…’, न्यूझीलंडच्याच माजी खेळाडूचा विलियम्सनला खोचक सल्ला
कमाईच्या बाबतीत आयपीएल देतंय थेट इंग्लिश प्रीमियर लीगला टक्कर, खुद्द दादांनीच केले स्पष्ट
‘माझ्यासारख्या आक्रमक फलंदाजाला कोणीही रोखू शकत नाही’, मुंबईच्या तुफानी फलंदाजाचे विधान