भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी १० सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये सुरू होणार होती, परंतु, भारतीय शिबिरातील वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे ती रद्द करण्यात आली. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्यानंतर सहाय्यक फिजिओ योगेश परमार देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने निर्णायक सामना रद्द केल्यानंतर इंग्रजी माध्यमांनी भारतीय खेळाडूंवर आरोप केले आहेत.
डेली मेलने आपल्या बातमीत म्हटले आहे, ‘जर एकही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला नाही, तर भारताने खेळण्यास नकार का दिला? १ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय खेळाडू उत्सुक आहेत. त्यांनी सामन्यापूर्वी प्रशिक्षण सत्र रद्द करुन आणि त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये विलगिकरणत राहण्याची खबरदारी घेतली होती.
एका बातमीत असेही म्हटले आहे की, ‘भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री लंडनच्या एका हॉटेलमध्ये संपूर्ण भारतीय ताफ्यासोबत एका पुस्तक प्रकाशनात सहभागी झाले, त्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले.’
बीबीसीने असेही आपल्या बातमीत नमूद केले की, सामना रद्द केल्याचा आयपीएलशी काहीतरी संबंध असू शकतो. त्यांच्या बातमीत म्हटले आहे की, ‘हे खूप विचित्र आहे कारण काल रात्री सर्व खेळाडूंनी त्यांच्या चाचण्या दिल्या आणि त्या निगेटिव्ह आल्या. आम्हीही हा सामना होईल असा विचार करून झोपलो होतो.’
सामना रद्द केल्यानंतर, बीसीसीआयने एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटले आहे की, ‘भारतीय क्रिकेट बोर्ड आणि ईसीबी यांच्यातील दृढ संबंध पाहता, बीसीसीआयने रद्द झालेला कसोटी सामना पुन्हा आयोजित करण्यासाठी इंग्लिश क्रिकेट बोर्डाला प्रस्ताव देत म्हटले होते की, दोन्ही मंडळांनी एकत्रितपणे हा कसोटी सामना पुन्हा व्हावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘दोन्ही मंडळांनी एकत्र येत अनेक फेऱ्यांवर चर्चा केली ज्यामुळे कसोटी सामने आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, भारतीय संघातील कोरोना प्रकरणामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. बीसीसीआयने नेहमीच खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे आणि त्यावर तडजोड केलेली नाही, या कठीण परिस्थितीबद्दल आणि त्यांच्या सहकार्याबद्दल बोर्ड ईसीबीचे आभार मानतो.’
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलवरही कोरोनाचे संकट; इंग्लंड दौऱ्यात खेळलेल्या या ६ खेळाडूंवर बीसीसीआयची करडी नजर
आयपीएल जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला काय करावे लागेल? स्टीव स्मिथ म्हणाला…
सर्वात मोठा इतिहास रचण्यापासून जोकोविच केवळ एक पाऊल दूर, फायनलमध्ये मेदवेदेवशी होणार टक्कर





