---Advertisement---

इंग्लंडची महिला गोलंदाज केट क्रॉसला खेळायचंय चेन्नई सुपर किंग्स संघात, कारणही आहे विशेष

On: बुधवार, सप्टेंबर 1, 2021 12:22 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा (आयपीएल) दुसरा टप्पा लवकरच १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. यासाठी सर्व संघांनी आता जोरदार तयारी चालू केली आहे. आयपीएल ही अशी स्पर्धा आहे, ज्याला जगभरातून पसंती मिळत असते. एक इंग्लंडची क्रिकेटपटू आहे जी महेंद्रसिंग धोनीमुळे चेन्नई सुपर किंग्सची(सीएसके) खूप मोठी चाहती आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भेदक गोलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या केट क्रॉसने याबाबत खुलासा केला आहे. तिला महिलांच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळायचे आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध केटने जूनमध्ये खेळविण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ७ विकेट्स घेतल्या होत्या. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तर तिने ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.

२०१३ साली इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या केटने आतापर्यंत ४ कसोटी सामने, ३१ एकदिवसीय सामने आणि १३ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तिने कसोटी सामन्यात १५ विकेट्स, एक दिवसीय सामन्यात ४२ विकेट्स आणि टी-२० सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतलेल्या आहेत.

केट सीएसकेची खूप मोठी चाहती आहे. हे तिच्या देखील चाहत्यांना चांगलेच माहित आहे की, तिला सीएसकेचा संघ किती प्रमाणात आवडतो. भारताचा फिरकीपटू गोलंदाज रवीचंद्रन अश्विनसोबत त्याच्या युट्युब चॅनेलवर बोलताना केटने याबाबत खुलासा केला होता. अश्विनसोबत बोलताना तिने सांगितले होते की, ती सीएसकेची खूप मोठी चाहती आहे आणि याचे एकमेव कारण आहे. ते म्हणजे सीएसके संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी.

याबाबत बोलताना ती म्हणाली होती की, “मला महिलांच्या आयपीएलमध्ये सीएसके संघाकडून खेळायला खूप आवडेल.”

आयपीएलच्या २०२१ पहिल्या टप्प्यात दरम्यान सीएसकेन या इंग्लिश चाहतीला सीएसकेची जर्सी देखील भेट म्हणून दिली होती. केट ही इंग्लंडची अत्यंत उत्कृष्ट गोलंदाज आहे. भारताविरुद्ध तिची अत्यंत उत्तम अशी खेळी राहिली आहे. कसोटी सामन्यात पदार्पण केल्यानंतर आपल्या दुसऱ्याच सामन्यात तिने भारताविरुद्ध ६ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत तिने ४ विकेट्स देखील घेतल्या होत्या.

दरम्यान, आयपीएलचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे. यातील पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
जड्डू इस बॅक! लीड्समध्ये दुखापतग्रस्त झालेल्या जडेजाने चौथ्या कसोटीपूर्वी सुरु केला नेट्समध्ये सराव, पाहा फोटो
तब्बल २३४३ दिवस कसोटीमध्ये अव्वल राहिलेल्या स्टेनकडे एकेकाळी बूट घ्यायलाही नव्हते पैसे, वाचा त्याचा प्रवास
Video: श्रीनाथ यांनी टाकलेला तो घातक चेंडू, ज्यामुळे फलंदाज जखमी होऊन पडला होता खाली

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---