इंग्लंड आणि भारत यांच्यात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना ‘होम ऑफ क्रिकेट’ अशी ओळख असलेल्या लाॅर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर खेळला गेला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ऐतिहासीक विजय मिळवला. भारतीय संघाने १५१ धावांनी इंग्लंडला पराभूत केले. भारतीय संघाच्या या कामगिरीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची महत्वाची भूमिका राहिली. मोहम्मद सिराजने या सामन्यात दोन्ही डावांत ४-४ विकेट मिळवल्या.
दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुलने अप्रतिम शतक करत संघाला मजबुती दिली होती. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मोहम्मद सिराजने केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनानंतरही तो या पुरस्काराचा मानकरी ठरला नाही. भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राच्या मते हा पुरस्कार केएल राहुलच्या ऐवजी गोलंदाज मोहम्मद सिराजला मिळायला हवा होता. त्याने त्याचे कारणही सांगितले आहे.
सामन्यात गोलंदाजांची भूमिका महत्वाची
आकाश चोप्रा त्याच्या यू-ट्यूब वाहिनीवर सामन्याविषयी बोलत होता. त्याने सिराजचे कौतुक करत म्हटले की, “केएल राहुलला सामनावीर पुरस्कार मिळाला, पण मी मोहम्मद सिराजला निवडले आहे. मला माहितीये की राहुलचे शतक महत्वाचे आहे. त्यामुळे संघ सुरक्षित राहतो. मात्र गोलंदाज सामना जिंकवतात. कारण तुम्हाला २० विकेट्सची आवश्यकता असते. म्हणून माझ्या हिशोबाने लॉर्ड्स कसोटीचा सामनावीर मोहम्मद सिराजच होता.”
आकाश चोप्रा पुढे बोलताना म्हणाला, “या गोलंदाजाने अशक्य गोष्टी करून दाखवल्या. याच्याजवळ कोणत्याही परिस्थितीत विकेट घेण्याचे कौशल्य आहे. तो विकेट घेण्यासाठी मन आणि जिव लावतो. जेव्हा तो चेंडू टाकण्यासाठी धावत असत तेव्हा असे वाटते की तो विकेट घेईल. हा त्याचा ७ वा कसोटी सामना होता, पण असे वाटत होते की ७० वा कसोटी सामना खेळत आहे.”
सिराजच्या गोलंदाजीत एकप्रकारचा आत्मविश्वास दिसतो. त्याने ज्याप्रकारे या सामन्यात प्रदर्शन केले आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याने संघासाठी सामन्याच्या पहिल्या डावात ४ विकेट घेतल्या, ज्यामध्ये सलग २ चेंडूत २ विकेट सामील आहेत. दुसऱ्या डावात त्याने पुन्हा ४ विकेट मिळवून सामन्यात एकूण ८ विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्सवरील दारुण पराभवानंतर स्टोक्स तिसऱ्या कसोटीत खेळणार? इंग्लंडच्या हेड कोचने दिले उत्तर
‘हा नवा भारत आहे, एकाला छेडाल तर पूर्ण संघ उत्तर देईल’; इंग्लंडचे खेळाडू अन् चाहत्यांना राहुलचा टोला
नेहमी शांत राहणाऱ्या रहाणेचे ट्रोलर्सला सणसणीत प्रत्युत्तर, केली ‘ही’ भन्नाट पोस्ट; तुम्हीही पाहा