इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात तिसरा वनडे सामना ओल्ड ट्रॅफोर्ड, मॅनचेस्टर येथे रंगला. या सामन्यात पाहुण्या संघाने ४७ चेंडू शिल्लक राखत ५ विकेट्सने जिंकला आहे. यामुळे भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ अशी जिंकत पराक्रम केला आहे. मालिका निर्णयाच्या या सामन्यात अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहलने उत्तम कामगिरी केली आहे. या सामन्यादरम्यान त्याला यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत त्याला सल्ला देताना दिसला आहे. यावेळी त्यांच्यात झालेले संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ४६वे षटक टाकण्यासाठी आला असता रिषभ पंत (Rishabh Pant) त्याला फलंदाजाला कसे बाद करण्याचे याचा सल्ला देताना दिसला आहे. रीस टॉपले (Reece Topley) हा खेळपट्टीवर आला असता पंतने चहलला चेंडू बरोबर स्टम्पवर टाकण्यास सांगितले. यावेळी भारताचा माजी कर्णधार-यष्टीरक्षक-फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) याचीच आठवण आली आहे. धोनीही गोलंदाजांना विकेट काढण्यासाठी चेंडू कसा टाकावा याचे मार्गदर्शन करताना दिसला आहे.
पंत चहलसोबत हिंदीत बोलताना दिसला आहे. यामध्ये त्याने चहलला, असाच चेंडू स्टम्पच्या थोडा मागे टाक आणि तसाच ठेव, यावर चहलनेही होकार दर्शवत डोके हलवले आहे. आणि पुढच्याच क्षणी त्याने टाकलेला चेंडू आउट ऑफ स्टम्पला टर्न होत टॉपले त्रिफळाचीत झाला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करत इंग्लंडला ४५.५ षटकात सर्वबाद २५९ धावांवर रोखले. भारताने हे लक्ष्य ४७ चेंडू आणि ५ विकेट्स राखत पूर्ण केले आहे. या विजयाने भारताने मालिकाही २-१ने जिंकली आहे.
The genius behind the stump #pant #Virat #Rohit #hardik #IndianCricketTeam @RishabhPant17 @mufaddal_vohra @vikrantgupta73 @SushantNMehta @mohsinaliisb pic.twitter.com/zOEvSwRM6b
— Anand S Negi (@7444Negi) July 17, 2022
या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडला सुरूवातीलाच धक्के दिले होते. मात्र कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) (६० धावा) आणि सलामीवीर जेसन रॉय (४१ धावा) यांच्या कामगिरीमुळे यजमान संघाने चांगली धावसंख्या उभारली. यामध्ये मोईन अलीच्या ३४ आणि क्रेग ओव्हरटनच्या ३२ धावांचाही समावेश आहे. भारताकडून पंत आणि पंड्याने चमकदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. पंतने नाबाद १२५ आणि पंड्याने ४ विकेट्स घेत ७१ धावाही केल्या. यावेळी सामनावीर पंत तर मालिकावीर पंड्या ठरला
या वनडे मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चहल तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ३ वनडे सामन्यात ७ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने २ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या कॅरेबियन दिग्गजाचा क्रिकेटला रामराम
तिसऱ्या वनडेपूर्वी पंतला मिळालेला खास सल्ला, भारताचा माजी दिग्गजाचे ट्वीट व्हायरल
ब्रेकिंग! इंग्लंडच्या कर्णधाराची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा