इंग्लंड क्रिकेट संघ कसोटीमध्ये कर्णधार बेन स्टोक्स आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामगिरी करत आहे. नुकतेच त्यांनी घरच्या मैदानावर भारतापाठोपाठ न्यूझीलंडचा पराभव केला आहे. त्यांनी न्यूझीलंडचा कसोटीमध्ये ३-० असा पराभव केला आहे. तसेच मागील महिन्यात एजबस्टनमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा पराभव करत पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत आणली होती. आता इंग्लंड दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. तर पहिल्या कसोटी सामन्याआधीच इंग्लंड क्रिकेट संघाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. त्याच्या तयारीसाठीच संपूर्ण संघ व्यस्त आहे. या मालिकेची सुरूवात १७ ऑगस्टपासून होणार आहे. पहिला सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. तर बाकीचे दोन सामने २५ ऑगस्ट आणि ८ सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत.
बुधवारी (१७ ऑगस्ट) सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंड क्रिकेट संघाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जो रुट, जेम्स अँडरसन, बेन स्टोक्स सोबतच इंग्लंडचे इतर खेळाडू खुर्च्या उचलताना दिसत आहेत. त्यांचा हा फोटो इंग्लंड बार्मी आर्मी या पेजने त्यांच्या सोशल मीडियाच्या अधिकृत अकाउंटवर शेयर केला आहे.
लॉर्डच्या मैदानावर ही गोष्ट काही नवीन नाही. याआधीही न्यूझीलंड, इंग्लंडचे खेळाडू खुर्च्या उचलताना दिसले आहेत.
The annual Lord's chair-carrying photo 🪑#ENGvSA pic.twitter.com/xFpZcyvMwE
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) August 15, 2022
इंग्लंडने मागील चारही कसोटी सामन्यात उत्तम कामगिरी करत सामने जिंकले असले, तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांची खरी कसोटी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघही कसोटीमध्ये चांगले प्रदर्शन करत आहे. त्यांनी यावर्षीच भारताचा देखील पराभव केला आहे. अशातच इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका रोमांचक होणार आहे. दोन्ही संघातली वनडे मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. तर टी२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत मालिका २-१ अशी जिंकंली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रुक, जो रुट, झॅक क्राउली, ऍलेक्स लीज, क्रेग ओव्हरटन, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), ऑली पोप, जेम्स अँडरसन, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, मॅटी पॉट्स, ऑली रॉबिनसन.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदर झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर, रिप्लेसमेंटचीही घोषणा
पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्म्रीती मंधाना का आली नाही? खरं कारण आलं समोर
आर्थिक संकट टाळण्यासाठी श्रीलंका बोर्डने थेट ‘या’ खेळाडूला ठोठावला दोन अब्ज रुपयांचा दंड!