पद्मभूषण हा भारतातील तिसरा मोठा नागरी सन्मान समजला जातो. भारतरत्न, पद्मविभूषण व त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार भारतात महत्त्वाचा समजला जातो.
क्रीडा क्षेत्रात अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व मेजर ध्यानचंद पुरस्कार असे महत्त्वाचे पुरस्कार दिले जातात. याचबरोबर खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीसाठी नागरी पुरस्कारानेही सन्मानित केले जाते.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला २०१४मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सचिनला १९९४मध्ये अर्जुन, १९९७-९८मध्ये राजीव गांधी खेलरत्न, १९९९ पद्मश्री, २००८ पद्मविभूषण व २०१४ भारतरत्न असे पुरस्कार मिळाले. पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला सचिन एकमेव क्रिकेटपटू तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला एकमेव खेळाडू आहे. List of cricketers who won Padma Bhushan award.
पद्मभूषण पुरस्कार मिळालेले पहिले क्रिकेटपटू हे सीके नायडु हे होते. तर २०१८मध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला हा पुरस्कार मिळाला. धोनीने आर्मीच्या ड्रेसमध्येच हा पुरस्कार स्विकारला होता.
पद्मभूषण पुरस्कार मिळालेल्या क्रिकेटपटूंची संपूर्ण यादी
१९५६: सीके नायडू
१९५८: विजय आनंद
१९७३: विनू मंकड
१९८०: सुनील गावसकर
१९८३: राजा भलिंद्र सिंग
१९९१: प्रोफेसर डीबी देवधर
१९९१: लाला अमरनाथ
१९९१: कपिल देव
२००२: चंदू बोर्डे
२०१३: राहुल द्रविड
२०१८: एमएस धोनी
ट्रेंडिंग घडामोडी-
-टीम इंडियात निवड न झाल्याने रात्रभर रडला होता विराट, या व्यक्तीला विचारली होती कारणं
-कॅप्टन कूल धोनी पुन्हा कर्णधार, टीम इंडिया नाही तर संघात मिळाली संधी
-फक्त या दोन गोलंदाजांमुळे मोहम्मद शमीचं करियरच गेलं बदलुन