---Advertisement---

कॅप्टन कूल धोनी पुन्हा कर्णधार, टीम इंडिया नाही तर संघात मिळाली संधी

On: बुधवार, एप्रिल 22, 2020 9:03 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज पीटर सिडलने आपल्या सर्वकालीन ११ जणांच्या प्रतिस्पर्धी कसोटी संघाची निवड केली आहे. सिडलच्या या संघात पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंना संधी मिळाली नाही. कारण सिडलच्या या संघात केवळ त्या खेळाडूंना संधी मिळाली आहे, ज्यांच्याविरुद्ध सिडलने सर्वाधिक सामने खेळले आहेत.

सिडलने (Peter Siddle) आतापर्यंत भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंंग्लंड या संघाविरुद्ध सर्वाधिक सामने खेळले आहेत. तसेच याच संघातील खेळाडूंचा त्याने आपल्या प्रतिस्पर्धी कसोटी संघात समावेश केला आहे.

याव्यतिरिक्त सिडलच्या या कसोटी संघात भारतीय संघाच्या २ खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांंचा समावेश आहे.

विशेष म्हणजे सिडलने आपल्या सर्वकालीन ११ जणांच्या प्रतिस्पर्धी कसोटी संघाच्या नेतृत्वाची आणि यष्टीरक्षणाची जबाबदारी धोनीला सोपविली आहे.

सिडलने आपल्या संघात सलामीला फलंदाजी करण्यासाठी इंग्लंडचा फलंदाज ऍलिस्टर कूक (Alastair Cook) आणि दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ग्रॅमी स्मिथला (Graeme Smith) निवडले आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून श्रीलंकेचा कुमार संगकाराची (Kumar Sangakkara) निवड करण्यात आली आहे. तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सचिनला निवडण्यात आले आहे.

याबरोबरच पाचव्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून दक्षिण आफ्रिकेचा मिस्टर ३६० म्हणजेच एबी डिविलियर्सची (AB De Villiers) निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आपल्या संघातील अष्टपैलू खेळाडू म्हणून सिडलने जॅक कॅलिसची (Jacques Kallis) निवड केली आहे.

याव्यतिरिक्त सिडलच्या या कसोटी संघात ४ गोलंदाजांचा समावेश आहे. त्यात इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच अँडरसन आणि ब्रॉडबरोबर वेगवान गोलंदाजी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनला (Dale Steyn) निवडण्यात आले आहे.

तर संघातील फिरकीपटू गोलंदाज म्हणून श्रीलंकेच्या रंगना हेरथचा (Rangana Herath) समावेश केला आहे. त्याचबरोबर संघातील बारावा खेळाडू म्हणून इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सची (Ben Stokes) निवड करण्यात आली आहे.

असा आहे पीटर सिडलचा सर्वकालीन ११ जणांचा प्रतिस्पर्धी कसोटी संघ-

ऍलिस्टर कूक, ग्रॅमी स्मिथ, कुमार संगकारा, सचिन तेंडुलकर, एबी डिविलियर्स, जॅक कॅलिस, एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, डेल स्टेन, रंगना हेरथ, जेम्स अँडरसन आणि बेन स्टोक्स (संघातील बारावा खेळाडू).

ट्रेंडिंग घडामोडी-

-८ तासांत कसोटीत २७० पेक्षा जास्त धावा करणारे ४ क्रिकेटपटू

-आयपीएल इतिहासात अनसोल्ड राहिलेले ३ महान भारतीय क्रिकेटपटू

-पृथ्वी शाॅ म्हणतो, या फलंदाजाबरोबर सलामीला फलंदाजीला जरा जास्तच मजा येते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---