---Advertisement---

वानखेडे स्टेडियममध्ये कोहली- धोनी आणि रोहितसोबत क्रिकेट सामना खेळू शकतो ‘हा’ स्टार फुटबॉलपटू!

On: शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025 5:07 PM
---Advertisement---

जर तुम्हीही फुटबॉलचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेसीचे (Lionel Messi) मोठे चाहते असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. मेस्सी यावर्षी डिसेंबरमध्ये भारतात येऊ शकतो. स्टार फुटबॉलपटू मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आपली चमकदार उपस्थिती दर्शवणार आहे.

मेस्सी यावेळी फुटबॉल नव्हे, तर क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो. तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंसोबत क्रिकेट सामना खेळू शकतो. पण, या संदर्भात अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, लिओनेल मेस्सी 14 डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियममध्ये विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. जर सर्व काही नियोजनाप्रमाणे झाले, तर मेस्सी सचिन, रोहित, धोनी आणि कोहलीसोबत क्रिकेट सामना खेळताना दिसू शकतो. (Lionel Messi, Sachin Tendulkar, Rohit Sharma, Ms Dhoni, Virat Kohli)

एका इव्हेंट एजन्सीने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे 14 डिसेंबरसाठी वानखेडे मैदान राखीव ठेवण्याची विनंती केली आहे. ह्याच कालावधीत मेस्सी भारतात येणार असल्याचे सांगितले जात आहे. एमसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मेस्सी 14 डिसेंबरला वानखेडे स्टेडियमला येईल. तो माजी व सध्या खेळणाऱ्या खेळाडूंशी क्रिकेट सामना खेळू शकतो. आयोजक लवकरच संपूर्ण वेळापत्रक जाहीर करतील.

लिओनेल मेस्सी 13 ते 15 डिसेंबरदरम्यान भारताच्या दौऱ्यावर राहू शकतो. या काळात तो मुंबईसोबतच दिल्ली आणि कोलकाता या शहरांना भेट देऊ शकतो. मेस्सी तब्बल 14 वर्षांनंतर भारतात येणार आहे. यापूर्वी तो 2011 साली एक फ्रेंडली फुटबॉल सामना खेळण्यासाठी भारतात आला होता.

पूर्वी अशी चर्चा होती की, मेस्सी ऑक्टोबरमध्ये अर्जेंटिनाची संपूर्ण राष्ट्रीय टीम घेऊन भारतात येणार आहे, पण त्या योजनेला सध्या स्थगिती देण्यात आली आहे.
सध्या 38 वर्षीय मेस्सी “इंटर मियामी” क्लबकडून खेळत आहे. पुढील वर्षी तो आपला शेवटचा FIFA World Cup खेळू शकतो. 2022 मध्ये त्याने आपल्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला वर्ल्ड चॅम्पियन बनवले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---