आबु धाबी। कोलकाता नाईट रायडर्सचे (केकेआर) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वेंकी म्हैसूर यांनी एक मोठी माहिती दिली आहे.
ते म्हणाले, “आयपीएलमध्ये 23 सप्टेंबरला होणाऱ्या संघाच्या पहिल्या सामन्यात ऑयन मॉर्गन आणि पॅट कमिन्स उपलब्ध राहिल. आबुधाबीच्या अधिकाऱ्यांनी खेळाडूंची क्वारंटाईनमध्ये राहण्याची मुदत 14 ऐवजी 6 दिवस करण्याला मान्यता दिली आहे. हा कालावधी आणखी कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.”
“आम्ही समजु शकतो की आमच्या तीन खेळाडूंना क्वारंटाइन राहावे लागेल. हे खेळाडू 17 सप्टेंबरला येथे दाखल होतील परंतु आमचा पहिला सामना 23 सप्टेंबरला होणार आहे,” असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
खेळाडूंबद्दल माहिती देताना ते म्हणाले, “या तिन्ही खेळाडूंनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला असेल. हे आमच्यासाठी आणि स्पर्धेसाठी चांगले आहे.“ यात इंग्लंडचा फलंदाज टॉम बंटन याच्याशिवाय कमिन्स आणि मॉर्गन या तीन खेळाडूंचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका 16 सप्टेंबर रोजी मँचेस्टर येथे संपेल. हे खेळाडू चार्टर्ड विमानाने येथे दाखल होतील.
आबु धाबीमधील नियमांनुसार, युएईच्या बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन ठेवणे अनिवार्य आहे. अहवालानुसार, असे ठरले आहे की खेळाडू सहा दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर संघ जैव-सुरक्षित वातावरनात सराव करू शकतात. दुबईमध्ये अनिवार्य क्वारंटाईन कालावधीचा कोणताही नियम नाही.
चाचणीत कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळल्यासच दुबईत क्वारंटाईन राहावे लागते. म्हणून, दुबईमध्ये दाखल होणारे खेळाडू त्यांच्या संघांसाठी पहिल्या दिवसापासून उपलब्ध असतील.
अहवालात असे म्हटले आहे की, हे शक्य झाले कारण हे खेळाडू जैव सुरक्षित वातावरणातून (मँचेस्टरमध्ये) येत आहेत. केकेआर आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ आबु धाबीत आहेत.
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचा भाग असलेला मुंबई इंडियन्सच्या संघात असा कोणताही खेळाडू नाही. उर्वरित सहा संघ दुबईमध्ये आहेत.
यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे अध्यक्ष संजीव चुरीवाला यांनीही दुजोरा दिला की यूकेहून दुबईत येणाऱ्या खेळाडूंनी आयपीएलच्या नियमांनुसार क्वारंटाईनमध्ये राहू नये.
म्हैसूर म्हणाले, “आम्ही जे काही केले ही एक योजना होती. आयपीएलच्या वैद्यकीय पथकाला त्याची कल्पना दिली होती. आम्ही त्यांना सांगितले की ते ब्रिटनमधील जैव-सुरक्षित वातावरणात आहेत.”
“आम्ही त्यांना एका चार्टर्ड विमानातून आणू आणि राहण्याची काळजी घेऊ. चाचणी, संपर्क विरहित वस्तू आणि त्यांना येण्याची परवानगी असलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेत त्यांना इथल्या बबलमध्ये समाविष्ट करू शकतो.” असेही पुढे बोलतांना ते म्हणाले
याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, “आयपीएलला हे समजले आणि एक एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार केली आहे. ज्यानुसार एका बबलपासून दुसऱ्या बबलकडे जाण्याऱ्या खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये राहण्याची आवश्यकता नाही.”
सीपीएल मधील खेळाडूंबद्दल बोलतांना म्हैसूर म्हणाले, “सीपीएल खेळून येथे येणाऱ्या खेळाडूंसाठी समान नियम हवे आहेत. सीपीएल गुरुवारी संपली आणि खेळाडू शनिवारी युएईला रवाना होतील. तेथून आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि ख्रिस ग्रीन केकेआर संघात सामील होतील.”
महत्त्वाच्या बातम्या-
-सराव करताना धोनीने मारलेला षटकार पाहून मुरली विजय झाला दंग; बोलती झाली बंद
-सीएसके संघात रैनाच्या जागी ‘हा’ असेल आदर्श खेळाडू; दिग्गजाने दिला पर्याय
-१५-२० नाही तर तब्बल ४५ खेळाडूंसह न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार हा संघ
ट्रेंडिंग लेख-
-आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या नाकी नऊ आणण्यासाठी कार्तिक निवडेल ‘या’ ११ शिलेदारांना
-या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?
-अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट