---Advertisement---

पीटरसनने केलेल्या त्या टीकेवर मॉर्गनने दिले असे उत्तर, पहा व्हिडिओ

---Advertisement---

लंडन। 2019 क्रिेकेट विश्वचषकातील 32 वा सामना मंगळवारी (25 जून) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात लॉर्ड्सवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 64 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने या विश्वचषकातील उपांत्य फेरीतील प्रवेशही निश्चित केला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना दिलेल्या 286 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून बेन स्टोक्स व्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला 30 च्यावर धावा करता आल्या नाहीत. स्टोक्सने 89 धावा करत एकाकी झुंज दिली. या सामन्यात इंग्लंडचा डाव 44.4 षटकात 221 धावांवर संपुष्टात आला.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन 4 धावांवर असताना स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. इंग्लंड फलंदाजी करत असताना सहाव्या षटकातील स्टार्कने टाकलेल्या पाचव्या चेंडूला मॉर्गनच्या बॅटची वरची कड लागली त्यामुळे लाँगलेगला गेलेला चेंडू पॅट कमिंन्सने झेलला त्यामुळे मॉर्गनला त्याची विकेट गमवावी लागली.

मॉर्गन बाद झाल्यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने ट्विट करत मॉर्गनवर टिका केली होती. त्याने ट्विट केले होते की ‘ओह नो! इयान मॉर्गन घाबरल्यासारखा दिसला. हे भयानक चिन्ह आहे.’

https://twitter.com/KP24/status/1143520969140711424

पीटरसनने पुढे आणखी एक ट्विट करत म्हटले आहे की ‘मिशेल स्टार्कच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार इयान मॉर्गन ज्याप्रकारे स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला ते पाहुन इंग्लंडसाठी ही समस्या असल्याचे मला जाणवले. मला आशा आहे की ती समस्या नसावी, पण मी काही काळापासून इतक्या सहजपणे आपली कमजोरी दाखवणारा कर्णधार पाहिला नाही.’

https://twitter.com/KP24/status/1143569356972023808

पीटरसनच्या या टीकेबद्दल मॉर्गनला सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विचारणा करण्यात आली. त्यावर मॉर्गनने उत्तर देताना फक्त म्हटले की ‘खरंच? मस्त.’

https://twitter.com/Saj_PakPassion/status/1143607489419780096

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

२७ वर्षांनंतर न्यूझीलंड-पाकिस्तानच्या या दोन खेळांडूबाबत घडला अनोखा योगायोग

गांगुलीपाठोपाठ भारताच्या या दिग्गज क्रिकेटपटूनेही दिला एमएस धोनीला पाठिंबा

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी बांगलादेशची साथ देणार हा माजी भारतीय खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment