इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ओएन मॉर्गन हा पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. जून २०२२ मध्ये खराब फॉर्म आणि फिटनेसच्या कारणास्तव त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. मात्र त्यानंतर द हँड्रेड लीगमध्ये सहभागी होत काही महिन्यांमध्येच तो पुन्हा मैदानावर उतरला असून झटपट फॉर्ममध्येही परतला आहे. द हँड्रेड लीगमध्ये लंडन स्पिरीट संघाचे नेतृत्त्व करताना त्याने कर्णधार खेळी करत संघाला ३ धावांनी विजय मिळवून दिला आहे.
जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर ओव्हल इनव्हिजीबल्स विरुद्ध मॉर्गनचा (Eoin Morgan) हा पहिलाच क्रिकेट सामना (Eoin Morgan Comeback) होता. या सामन्यात ३५ वर्षीय मॉर्गनची बॅट चांगलीच तळपली. त्याने मधल्या फळीत फलंदाजीला येत २९ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४७ धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १६२.०७ इतका होता.
त्याच्या बॅटमधून निघालेल्या या ताबडतोब खेळीमुळे १०० चेंडूंच्या या स्पर्धेत त्याच्या लंडन स्पिरीट (London Spirit) संघाने ६ विकेट्सच्या नुकसानावर १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ओव्हल इनव्हिजीबल्सला १०० चेंडूत १६८ धावाच करता आल्या आणि लंडन स्पिरीट संघाने पहिल्याच सामन्यात बाजी मारली.
https://www.instagram.com/reel/Cg2PrYrjbbj/?utm_source=ig_web_copy_link
ओएन मॉर्गनने घेतला सूड
दरम्यान मॉर्गनसाठी गेले काही महिने सोपे राहिले नव्हते. आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्त्वपद सांभाळणाऱ्या मॉर्गनवर त्याच्याच फ्रँचायझीनेही विश्वास दाखवला नव्हता. त्याला आयपीएल २०२२ मध्ये कोणत्याही फ्रँचायझीने विकत घेतले नव्हते.
मॉर्गनला टी२० विश्वचषक २०२२ पर्यंत इंग्लंडच्या संघाचे नेतृत्त्व करायचे होते. परंतु गोष्टी त्याच्या बाजूने न राहिल्याने त्याला आपला निर्णय बदलावा लागला. त्याने नेदरलँड्सविरुद्धच्या वनडे मालिकेत शेवटचे इंग्लंडच्या संघाने नेतृत्त्व केले. या मालिकेत इंग्लंडने नेदरलँड संघाला वनडे मालिकेत क्लिन स्वीप केले होते. मात्र मॉर्गनचा वैयक्तिक फॉर्म चांगला राहिला नव्हता. याचमुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र आता द हँड्रेडमधून पुन्हा फॉर्ममध्ये परतत मॉर्गनने त्याच्या टीकाकारांना चपराक लगावली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘आशिया कप आणि टी२० विश्वचषकांत कोण असेल कर्णधार रोहितचा जोडीदार?’, माजी दिग्गजाने स्पष्टचं सांगितलं
‘मला स्म्रीती किंवा हरमनप्रीत बनायचं नाही’, भारतीय खेळाडूची प्रतिक्रिया वेधतेय लक्ष
हॉकीच्या मॅचदरम्यान खेळाडूंमध्ये रंगली कुस्तीची लढत, मारहाणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल