भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची फलंदाजी व नेतृत्वाचे जगभरात चाहते आहेत. आगामी आशिया चषक व वनडे विश्वचषकात त्याच्यावर सर्वांची नजर असेल. असे असताना इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गन याने नुकतेच एका मुलाखतीत बोलताना रोहितचे तोंडभरून कौतुक केले.
रोहितच्या नेतृत्वाबाबत मॉर्गन याने एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटले,
“मी कर्णधार आणि नेता रोहितचा मोठा चाहता आहे. आपल्या संघाला सोबत घेऊन जाण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याच्या संघातील अनेक खेळाडूंशी मी बोललो आहे. त्यांच्या सर्वांच्या बोलण्यातून स्पष्टपणे समजून येते की ते त्याचा किती आदर करतात. ही सगळी एका चांगल्या नेत्याची लक्षणे आहेत.”
मॉर्गन याच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने 2019 वनडे विश्वचषक जिंकला होता. त्याने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर समालोचक म्हणून भूमिका बजावली आहे.
रोहित शर्मा हा यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. आयपीएलमध्ये पाच विजेतेपदे जिंकणारा तो पहिला कर्णधार होता. त्याच्याकडे 2021 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व देण्यात आले. आगामी आशिया चषक व वनडे विश्वचषक या दोन्ही स्पर्धांमध्ये तो भारतीय संघाचे नेतृत्व करेल. 2011 नंतर भारतीय संघाला विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे या दोन्ही स्पर्धा रोहितसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतील.
(Eoin Morgan Said Am Big Fan Of Rohit Sharma)
महत्वाच्या बातम्या-
“धोनीने रोहितला 2011 वर्ल्डकपसाठी डावललेले”, माजी निवडसमिती सदस्याचा धक्कादायक खुलासा
अल्टिमेट टेबल टेनिस लीगमध्ये जयपूर पॅट्रीओट्स या नव्या फ्रँचायझीची एन्ट्री