इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार इयान मॉर्गनने त्याच्या भविष्यातील कारकिर्दीविषयी चित्र स्पष्ट केले आहे. सध्या खराब फॉर्मशी झगडत असेलेल्या मॉर्गनने भविष्यात तो अजून किती काळ क्रिकेट खेळू शकतो, याविषयी महत्वाचे संकेत दिले आहेत. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात इंग्लंड संघाला विजय मिळवून देण्यासाठी मार्गन खेळू इच्छित आहे.
इयान मॉर्गन (Eoin Morgan) २०१५ आयसीसी विश्वचषकाच्या ठीक आधी इंग्लंड संघाचा कर्णधार बनला होता. २०१९ मध्ये त्याने कर्णधाराच्या रूपात इंग्लंड संघासाठी पहिला विश्वचषक जिंकाल होता. त्याने इंग्लंड क्रिकेटमधील योगदान मोठे असले तरी, तो सध्या त्याच्या प्रतिभेनुसार प्रदर्शन करताना दिसत नाहीये. सध्या तो सततच्या फिटनेसच्या बाधा आणि खराब फॉर्म यांच्याशी झगडताना दिसत आहे.
इंग्लंड संघात लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, मोईन अली आणि बेन स्टोक्स अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश असल्यामुळे खराब फॉर्ममधील मॉर्गनला संघात मिळणारे स्थान बऱ्याच दिवसांपासून चर्चेत राहिले आहे. या सर्व बाबींवर मॉर्गनने स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला की, “आता खूप पुढचे काही बोलू शकणार नाही. सध्या टी२० विश्वचषक ही माझी प्राथमिकता आहे. मी इंग्लंडला विश्वचषक जिंकवून देण्यासाठी मदत करू शकतो.” या वक्तव्यानंतर पुढच्या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातील त्याच्या सहभागाविषयी शंका निर्माण झाली आहे.
“अनेकदा तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागोपाठ सामने खेळावे लागतात. वेस्ट इंडीजमध्ये मी शनिवारी आणि रविवारी लागोपाठ दोन सामने खेळले. परंतु बुधवारच्या सामन्यात मी दुखापग्रस्त झालो. हा दोन दिवसात दोन सामने खेळण्याचा परिणाम होता. मी इंग्लंडसाठीही प्रत्येक सामना खेळू शकत नाही,” असेही मॉर्गन पुढे म्हणाला.
दरम्यान, इंग्लंड संघाने मागच्या एक वर्षापासून एकही एकदिवसीय सामना खेळला नाहीये. तसेच इयान मॉर्गनने स्वतः देखील जानेवारी महिन्यानंतर इंग्लंडसाठी एकही सामना खेळला नाहीये. अशात ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचा फॉर्म कसा आहे, हे सध्या तरी सांगता येणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvsSA T20: अर्शदीप की उमरान कोणाला मिळणार चौथ्या सामन्यात संधी? वाचा भारतीय दिग्गजाने काय सांगितले
IND vs SA | चौथ्या टी२० सामन्यात ‘या’ ६ खेळाडूंवर असेल विशेष जबाबदारी
कर्णधार पंत पूर्ण करणार षटकारांचे खास ‘शतक’; तर भुवनेश्वर, अक्षरकडेही ‘हे’ विक्रम करण्याची संधी