पुणे: स्पोर्टीलव व महाराष्ट्र क्रीडा यांच्या तर्फे 6व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत स्पर्धेत अर्न्स्ट अँड यंग, सेल २ वर्ल्ड, युनियन बँक ऑफ इंडिया, महानगर बँक या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपुर्व फेरीत निकेश कुमारच्या 43 धावांच्या बळावर अर्न्स्ट अँड यंग संघाने सारस्वत बॅंक संघाचा 5 गडी राखून पराभव केला.
पहिल्यांदा खेळताना निलेश गोरीवालेच्या 27 तर सचिन गाडेच्या 29 धावांसह सारस्वत बॅंक संघाने 9 षटकात 5 बाद 70 धावा केल्या. 70 धावांचे लक्ष अर्न्स्ट अँड यंग संघाने केवळ 8 षटकात 3 बाद 71 धावांसह पुर्ण करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. निकेश कुमार सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत विशाल सोनटक्केच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर युनियन बँक ऑफ इंडिया संघाने 11 धावांनी पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. पहिल्यांदा खेळताना विशाल सोनटक्केच्या 36 व वैभव शिंदेच्या 24 धावांसह युनियन बँक ऑफ इंडिया संघाने 9 षटकात 3 बाद 70 धावा केल्या.
70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एम्प्टोरीज संघ 9 षटकात 4 बाद 59 धावात गारद झाला. योगेश मोहिते व विशाल सोनटक्के यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला.
अन्य लढतीत राज पन्वरच्या 35 धावांच्या बळावर सेल २ वर्ल्ड संघाने टीआरडीडीसी संघाचा 5 गडी राखून तर स्वप्निल बोर्डेच्या दमदार 48 धावांच्या जोरावर महानगर बँक संघाने गालाघर संघाचा 37 धावांनी पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उप-उपांत्यपुर्व फेरी
सारस्वत बॅंक- 9 षटकात 5 बाद 70 धावा(निलेश गोरीवाले 27, सचिन गाडे 29, सुधिर साळुंखे 20, विश्वनाथ जगताप 2-24, किरण शेट्टी 2-13)
पराभूत वि अर्न्स्ट अँड यंग – 8 षटकात 3 बाद 71 धावा(निकेश कुमार 43, निलेश पवार 2-19) सामनावीर- निकेश कुमार
अर्न्स्ट अँड यंग संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.
युनियन बँक ऑफ इंडिया- 9 षटकात 3 बाद 70 धावा(विशाल सोनटक्के 36, वैभव शिंदे 24, प्रविण पाटील 2-21) वि.वि एम्प्टोरीज- 9 षटकात 4 बाद 59 धावा(प्रविण पाटील 38, योगेश मोहिते 21, विशाल सोनटक्के 2-21) सामनावीर- विशाल सोनटक्के
युनियन बँक ऑफ इंडिया संघाने 11 धावांनी सामना जिंकला.
टीआरडीडीसी – 9 षटकात 2 बाद 51 धावा(अराम भट्टाचार्य 25, हर्षद शेख 2-19) पराभूत वि सेल २ वर्ल्ड- 7.2 षटकात 3 बाद 53 धावा(राज पन्वर 35, क्रिश्तम शेट्टी 2-18) सामनावीर- राज पन्वर
सेल २ वर्ल्ड संघाने 5 गडी राखून सामना जिंकाला.
महानगर बँक – 9 षटकात 3 बाद 97 धावा(स्वप्निल बोर्डे 48, रोशन कदम 2-43) वि.वि गालाघर – 9 षटकात 4 बाद 60 धावा(सुभेंदू पांडे 29, राहूल लंके 2-20) सामनावीर- स्वप्निल बोर्डे
महानगर बँक संघाने 37 धावांनी सामना जिंकला.