२४वर्षांपुर्वी कोलंबियन फुटबॉलपटू आंद्रेस इस्कोबारचा घरी परतताना खून करण्यात आला होता. २७ वर्षीय आंद्रेसचा खून २ जुलै १९९४ला झाला.
मेडेलीन येथील एका बारच्या बाहेर त्याचा ६ गोळ्या घालून खून करण्यात आला. ही बातमी कोलंबियाचा मिडफील्डर गॅब्रिएल बारब्रास गोमेझने त्याच्या कुटूंबियांना दिली होती.
1994च्या फिफा विश्वचषकातून कोलंबियाचा संघ बाहेर पडला होता.
आंद्रेसचा खून हा फिफामधील एक काळा दिवस ठरला. तसेच त्या उर्वरीत स्पर्धेसाठीही ती निराशेची बाब ठरली.
फुटबॉल जगतासाठी तो एक चांगला डिफेंडर तर होताच पण त्याने अटलेटिको आणि कोलंबिया राष्ट्रीय संघासाठी उत्कृष्ठ कामगिरी केली.
Andres 24 años sin vos; que falta la que haces…. CABALLERO. pic.twitter.com/B3xgclc1w6
— Jhon Jairo Tréllez (@JJTrellezv) July 2, 2018
“माझा तो लहान भाऊ होता. त्याचा आम्हाला अभिमान होता. तो एक चांगला व्यक्ती होता.”, असे आंद्रेसची बहीण मारिया इस्कोबार म्हणाली.
या घटनेला 24 वर्षे पूर्ण झाली आहेत . 1994च्या विश्वचषकात त्याने चुकून अमेरिकेसाठी केलेल्या गोलमुळे त्याला चाहते त्रास देत होते.
आंद्रेसच्या कुटूंबियांनी 2014चा फिफा विश्वचषकातील कोलंबियाचे सामने बघायला हजेरी लावली होती.
“या घटनेचा परत-परत उल्लेख केल्याने आम्हांला त्रास होतो आहे. पण आंद्रेस हा उत्तम खेळाडू होता. त्याची प्रतिमाच तशी तयार झाल्याने लोक पुन्हा-पुन्हा त्याच्या आठवणी काढत आहेत “, असे त्याचा भाऊ जोस म्हणाला.
हंबर्बो मुनोझ कॅस्ट्रो हा आंद्रेसचा मारेकरी होता. त्या 43 वर्षांची शिक्षासुद्धा सुनावली होती. पण 11वर्षे त्याने ही शिक्षा भोगली.
आंद्रेसच्या मारेकऱ्यांनी त्याला का मारले हे अजूनही पोलिसांना कळाले नाही. तसेच कॅस्ट्रोचे कोलंबियातील शक्तिशाली माफियाशी चांगले संबंध होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-Video: जेव्हा नेहमीच शांत असणारा भुवनेश्वर कुमार चिडतो!
-केवळ २० धावा करणाऱ्या कोहलीने साजरी केली विक्रमांची दिवाळी