‘क्रिकइन्फो’ वेबसाइटनं 21व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी इलेव्हनची निवड केली आहे. तज्ञांनी या टीमची निवड एका प्रक्रियेद्वारे केली. या टीममध्ये नव्वदच्या दशकात खेळलेल्या खेळाडूंचाही समावेश करण्यात आला, परंतु त्यांनी किमान 30 कसोटी सामने खेळले असतील. हा एक प्रकारे गेल्या 25-30 वर्षांतील भारताचा सर्वोत्तम संघ आहे. संघ निवडताना अशा खेळाडूंचीही निवड करण्यात आली, ज्यांनी सर्व परिस्थितींमध्ये चांगली कामगिरी केली.
सलामीला सेहवागच्या नावावर सर्व तज्ज्ञांचं एकमत झालं. मात्र दुसऱ्या सलामीवीरासाठी अनेक नावांची चर्चा होती. यामध्ये रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्या नावाचा समावेश आहे. ही चर्चा एवढ्या टोकाला पोहोचली की, तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराचं नावही सलामीवीर म्हणून आलं. अखेर दुसऱ्या सलामीवीराची जागा राहुल द्रविडला देण्यात आली. व्हीव्हीएस लक्ष्मणला तिसऱ्या क्रमांकावर स्थान दिलं गेलं. याचा एक अर्थ असा आहे की, तज्ज्ञांच्या नजरेत गेल्या 35 वर्षात सेहवागचा जोडीदार बनवता येईल असा दुसरा कोणीही सलामीवीर नाही.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, भारतीय क्रिकेटच्या सर्वात मोठ्या सुपरस्टार पैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीला 21व्या शतकातील सर्वोत्तम भारतीय कसोटी इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. यष्टीरक्षक रिषभ पंतनं कसोटीमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. त्यानं अवघ्या काही वर्षांत स्वत:चं नाव निर्माण केलं, ज्यामुळे त्याला या संघात जागा मिळाली आहे.
‘क्रिकइन्फो’नं निवडलेली 21व्या शतकातील भारताची सर्वोत्तम कसोटी इलेव्हन खालीलप्रमाणे
(1) वीरेंद्र सेहवाग, (2) राहुल द्रविड, (3) व्हीव्हीएस लक्ष्मण, (4) सचिन तेंडुलकर, (5) विराट कोहली, (6) रिषभ पंत (यष्टीरक्षक), (7) रवींद्र जडेजा, (8) रविचंद्रन अश्विन, (9) अनिल कुंबळे, (10) जसप्रीत बुमराह, (11) झहीर खान, (12) मोहम्मद शमी (राखीव खेळाडू)
हेही वाचा –
रिकी पाँटिंग येताच पंजाब किंग्जच्या दोन खास सदस्यांचा रामराम, एका भारतीयाचाही समावेश
विराट कोहली विरुद्ध जो रुट वादात युवराज सिंगची उडी! सांगितलं कोणता खेळाडू सर्वोत्तम
काय सांगता! भारत-पाकिस्तान वर्ल्डकप सामन्याचं तिकीट फक्त 342 रुपयांना! या दिवशी होणार ‘महामुकाबला’