---Advertisement---

युरो कप २०२०: उपांत्यपूर्व फेरीतील काही नेत्रदीपक गोल, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, जुलै 5, 2021 9:23 PM
---Advertisement---

फुटबॉलविश्वातील दुसरी सर्वात मोठी स्पर्धा असलेली युरो कप २०२० अखेरच्या टप्प्यात आली आहे. स्पर्धेतील अंतिम चार संघ आणि उपांत्य फेरीचे कार्यक्रम जाहीर झाले असून, इटली व इंग्लंड या संभाव्य विजेत्यांनी उपांत्य फेरीत धडक मारली. तीन वेळचा युरो विजेता स्पेन आपल्या तरुण खेळाडूंच्या जोरावर अंतिम चारमध्ये पोहोचला. तर, डेन्मार्कने सर्वांना चकित करत इथपर्यंत मजल मारली. उपांत्य फेरीचे सामने ६ व ७ तारखेला खेळविले जातील. तत्पूर्वी, आपण उपांत्यपूर्व फेरीत झळकावल्या गेलेल्या काही अप्रतिम गोलची झलक पाहूया.

इटली वि बेल्जियम
दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात संपूर्ण स्पर्धेदरम्यान एकही पराभव अथवा ड्रॉ न पाहिलेल्या इटली संघाने पहिल्या सत्रातच दोन गोल करत सामन्यावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न केला. निकोलो बरेला याने ३१ व्या तर, लोरेन्सो इनसिगे याने ४४ व्या मिनिटाला हे गोल केले. बेल्जियमकडून पहिले सत्र संपण्याच्या अखेरीस रोमेलु लूकाकू याने गोल करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सामन्यात त्यानंतर एकही गोल न झाल्याने इटलीने दिमाखात उपांत्य फेरी गाठली.

https://www.youtube.com/watch?v=Vg62e_4iqOc

इंग्लंड वि युक्रेन
उपांत्य फेरीचे तीन संघ निश्चित झाल्यानंतर अखेरची चौथी उपांत्यपूर्व फेरी वेंबली स्टेडियमवर खेळली गेली.‌ घरच्या मैदानावर खेळत असलेल्या इंग्लंडने युक्रेनविरुद्ध याचा पुरेपूर फायदा घेतला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने चौथ्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला डिफेंडर हॅरी मॅग्वायरने गोल करत आघाडी वाढवली. ५० व्या मिनिटाला केनने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केला. हेंडरसनने ६२ व्या मिनिटाला गोल करत युक्रेनच्या आव्हानातील हवा काढली. त्यानंतर गोल जात न झाल्याने इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

https://www.youtube.com/watch?v=TaXfLiSY6Wo

अशा रंगतील लढती
युरो कप २०२० ची पहिली उपांत्य लढत स्पेनविरूद्ध इटली या तुल्यबळ संघांमध्ये होईल. तर, दुसरी लढत इंग्लंड विरुद्ध सर्वांना चकित करून उपांत्य फेरीत पोहोचलेल्या डेन्मार्कशी होईल. दोन्ही लढती इंग्लंडमध्ये वेंबली स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना याच मैदानावर ११ जुलै रोजी होईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

विजयाचा उन्माद! उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर खेळाडूंनी भर मैदानात काढल्या पॅन्ट

युरो कपमधील पराभवानंतर जर्मनीच्या विश्वविजेत्या खेळाडूने स्वीकारली निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---