२०११ क्रिकेट विश्वचषकात युवराज सिंगने फलंदाजी व गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली होती. याच कारणामुळे त्याला मालिकावीर घोषीत करण्यात आले होते. परंतु याच विश्वचषकात युवराजने एक अजरामर खेळी केली होती.
ही खेळी युवराजने साखळी फेरीत वेस्ट इंडिज संघाविरुद्ध केली होती. भारताने आपल्या पहिल्या काही विकेट झटपट गमावल्यानंतर युवीने हा कारनामा केला होता. तेव्हा सचिन व गंभीर लवकर बाद झाले होते. यावेळी सध्याच्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व युवराजने १२२ धावांची भक्कम भागीदारी केली होती. २ बाद ५१ वरुन ३ बाद १७३ अशा सुस्थितीत भारताला या जोडीने आणले होते.
कोहली ५९वर बाद झाल्यावरही युवीने आपला खेळ पुढे सुरुच ठेवला व एमएस धोनी, सुरेश रैना यांच्यासोबत छोट्या छोट्या भागीदारी केल्या. या खेळीत युवराने १२३ चेंडूत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ११३ धावा केल्या होत्या. भारतीय संघ २६८वर सर्वबाद झाल्यावर दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करायला आलेला वेस्ट इंडिज संघ १८८ धावांतच तंबूत परतला. भारताकडून झहीर खान व अश्विनने चांगली कामगिरी केली होती. परंतु विशेष म्हणजे युवराजने या सामन्यात दोन महत्त्वपुर्ण विकेट्स घेतल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
–भारतीयांसारखं क्रिकेटवर प्रेम जगात कुणीच करत नाही
–आणि ती गोष्ट घडताच मराठमोळ्या प्रविण तांबेला नाही आवरले अश्रु
–मी टीम इंडियाला जिंकवायला आलो आहे, हार्दिकला संघाबाहेर काढायला नाही
–बीसीसीआयची काटकसर सुरु! असे वाचवणार टीम इंडियाचे पैसे