काल(१५ ऑगस्ट) भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने निवृत्तीची घोषणा करुन ४० मिनीटंही झाली नाही तोच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे त्याच्या निवृत्तीबद्दल भारतातील अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यात युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.
पंतने ट्विट केले आहे की ‘रैना भैय्या तू दिलेल्या पाठिंब्याबद्दल, प्रेमाबद्दल आणि मार्गरदर्शनाबद्दल थँक यू. मस्ती, मजा आणि कौतुक पुढेही सुरु राहिल. तू देशासाठी दिलेले योगदान नेहमी लक्षात राहिल.’
Thankyou for your unconditional support love and guidance Raina Bhaiya 👬 Masti, mazaak aur tafri zaari rahegi 🤓 Your service to the country will be remembered forever 🇮🇳 Upwards and Onwards 🙌🏻 @ImRaina pic.twitter.com/chgAbmI2Ja
— Rishabh Pant (@RishabhPant17) August 15, 2020
तसेच शमीने ट्विट केले की ‘तूझ्याबरोबर ड्रेसिंग रुम शेअर करण्यापासून ते माझ्याकडे घरी सराव करण्यापर्यंत आणि जेवणाच्या चर्चेपर्यंत मी सर्व मिस करेल. तूझ्या दुसऱ्या इनिंगमध्येही चांगली कामगिरी कर.’
From sharing the dressing room with you, practicing with you in my backyard and having conversations over meals, I will miss all of that. Go well brother in your second innings #RainaRetires pic.twitter.com/vUeRjnRAPo
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) August 15, 2020
विशेष म्हणजे गेल्या महिन्यात रैनाने पंत आणि शमीबरोबर वेळ घालवला होता. ज्यावेळी कोरोना व्हायरसमुळे मार्चमध्ये स्थगित झालेली आयपीएल २०२० स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे समजल्यावर रैना आणि पंत दोघेही बॅट खरेदी करायलाही गेल्याचे दिसले होते.
https://twitter.com/ImRaina/status/1286675802029875200
त्याचबरोबर रैना पियुष चावलासह शमीच्या फार्महाऊसवरही गेले होते. तिथे त्यांनी सरावही केला होता. पण कदाचित रैनाने पंत आणि शमी बरोबर वेळ घालवल्यानंतरही त्यांना कल्पना नसावी की रैना काही दिवसात निवृत्ती घेणार आहे.
https://twitter.com/ImRaina/status/1284508768701681664
सुरेश रैना भारताकडून १८ कसोटी, २२६ वनडे व ७८ टी२० सामने खेळला असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ शतके आणि ४८ अर्धशतकांसह ७९८८ धावा केल्या आहेत. तो २०११ विश्वविजेत्या भारतीय संघाचा भागही होता.