---Advertisement---

‘आमच्या संघातील प्रत्येक खेळाडू मॅच विनर’, आशिया चषकातून बाहेर झालेल्या आफ्रिदीचा सूचक इशारा

Shaheen-Afridi-Pakistan
---Advertisement---

येत्या २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत आशिया चषक २०२२ चा थरार रंगणार आहे. आशिया चषकातील सर्वात यशस्वी भारतीय संघ आठव्या विजेतेपदासाठी प्रयत्नशील असेल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ २८ ऑगस्टपासून पाकिस्तानविरुद्ध त्यांच्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात करेल. मात्र दुबई येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाला आहे.

या मोठ्या स्पर्धेतून (Asia Cup 2022) बाहेर झाल्यानंतर आफ्रिदीने (Shaheen Afridi) आपल्या पाकिस्तान संघाला आशिया चषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विरोधी संघांना सावध राहण्याचा इशाराही केला आहे.

शाहिन पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या योगदानामुळे पाकिस्तान संघाने टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारताला पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. आफ्रिदीने या सामन्यात ४ षटके फेकताना ३१ धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या. केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली यांना त्याने बाद केले होते. या दमदार प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर निवडले गेले होते.

तसेच त्याचे टी२० विश्वचषक २०२१ मधील एकूण प्रदर्शनही उल्लेखनीय राहिले होते. अशात टी२० स्वरूपाच होणाऱ्या आशिया चषकातही तो भारताविरुद्ध आणि इतर संघांविरुद्ध कर्दनकाळ ठरू शकला असता. परंतु गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेला मुकावे लागणार आहे. अशात त्याच्या अनुपस्थितीत पाकिस्तानचे वेगवान गोलंदाजी आक्रमण दुबळे पडू शकते. परंतु आता खुद्द आफ्रिदीने आपल्या संघाचे मनोबळ वाढवण्याचे काम (Shaheen Afridi Statement) केले आहे.

आफ्रिदीने पाकिस्तान संघाचा फोटो शेअर करत ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “आमच्या प्लेइंग इलेव्हनमधील प्रत्येक खेळाडू मॅच विनर आहे. माझ्या संघाला आगामी आशिया चषकासाठी शुभेच्छा. तसेच चाहते मी लवकर दुखापतीतून बरे होण्यासाठी प्रार्थना करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.” 

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाचा ‘डबलवार’, झिम्बाब्वेला हरवत पाकिस्तानच्या ३२ वर्षे जुन्या विश्वविक्रमाला तडा
शेवटचा सामना जिंकत ‘राहुल आर्मी’ धोक्यात आणणार पाकिस्तानचा विक्रम! वाचा काय आहे गणित
आता काय म्हणावे? मोठे मनाने ज्याला ऑटोग्राफ दिला, त्याच चाहत्याने चोरलं खेळाडूचं ५६ लाखांचं घड्याळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---