---Advertisement---

“जेव्हा मैदानात उतरते, तेव्हा धोनीचे सल्ले आठवते”, टीम इंडियात संधी मिळालेल्या महिला क्रिकेटपटूने सांगितला अनुभव

On: रविवार, मे 16, 2021 4:31 PM
---Advertisement---

भारतीय महिला संघाचा पुढील महिन्यात इंग्लंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघाला १ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवडही करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी २३ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज इद्राणी रॉय हिला देखील भारतीय संघात संधी मिळाली आहे. तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीचा तिला फायदा झाला.

इंद्राणी ही मुळची पश्चिम बंगालमधील असली तरी ती काहीवर्षांपूर्वी झारखंडला स्थायिक झाली आहे. त्यामुळे ती देशांतर्गत क्रिकेट झारखंडकडून खेळते. विशेष म्हणजे तिला रांचीमध्ये सराव करताना एकदा भारताचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनीला भेटण्याचीही संधी मिळाली होती. यावेळी धोनीने तिला अनेक गोष्टींबाबत सल्ले दिले होते. याबद्दल तिने स्पोर्टस्टारशी बोलताना खुलासा केला आहे.

ती म्हणाली, ‘मागीलवर्षी रांचीमधील एका सराव सत्रादरम्यान माझी बराचवेळ माही सरांबरोबर चर्चा झाली. त्यावेळी आम्ही माझ्या खेळात कशा सुधारणा होऊ शकतात याबद्दल आम्ही बोललो आणि त्यांनी मला सांगितले की मी पाच मीटरच्या परिघात माझ्या प्रतिक्रिया आणि हालचाली सुधारण्याकडे लक्ष द्यायला हवे. यष्टीरक्षकांसाठी ती महत्त्वाची गोष्ट असते. त्यांनी मला सल्ला दिला की मी प्रयत्न करत राहायला हवे आणि सुधारणा करत रहावी. त्यामुळे खरंतर मला मदत झाली.’

ती पुढे म्हणाली, ‘माही सरांसारख्या दिग्गज खेळाडूकडून एखाद-दुसरी गोष्ट शिकणे, भाग्याचे आहे आणि त्यांच्या सल्ल्याची मला माझा खेळ सुधारण्यात मदत झाली. जेव्हाही मी मैदानात फलंदाजी करते, तेव्हा त्यांनी दिलेले सल्ले आठवण्याचा प्रयत्न करते.’

त्याचबरोबर पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळाल्याबद्दल ती म्हणाली, ‘मेहनतीचे फळ मिळाले. मी काही वरिष्ठ खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रुम शेअर करण्यासाठी आणि त्यांच्याकडून शिकण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय संघात निवड होण्याची माझी पहिलीच वेळ आहे आणि जर मला अंतिम ११ जणींच्या संघात संधी मिळाली, तर मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल.’

इंग्लंड दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ – मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव.

इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकेसाठीचा भारतीय संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, सिमरन दिल बहाद्दूर.

महत्त्वाच्या बातम्या –

शतक हुकलं पण किर्तीमान केला, इंग्लिश कर्णधाराच्या जबराट कामगिरीने विराटसेनेची चिंता शिगेला!

संघ निवडकर्त्यांशी पंगा घेणे पडले महागात, वेळेपुर्वीच ‘या’ ५ भारतीयांची कारकिर्द आली संपुष्टात

“आयपीएलशी इतर लीगची तुलना होऊच शकत नाही”, पाकिस्तानी खेळाडूचा पीएसएलला घरचा आहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---