आयपीएल (IPL) फ्रेंचायजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी आयपीएल मेगा लिलावाच्या (mega auction) पार्श्वभूमीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विश्वनाथन यांच्या मते कर्णधार एमएस धोनी जेव्हा कधी संघ निवडतो तेव्हा चाहत्यांची कधीच निराशा होत नाही. संघ त्याच्या अपेक्षांना नेहमी पात्र ठरत आला आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या संघ निवडीमध्ये कर्णधार एमएस धोनीची महत्वाची भूमिका असते. त्याचे मत विचारत घेऊनच प्रत्येक निर्णय घेतला जातो. संघ कधीच जास्त मोठ्या नावांवर अवलंबून राहिलेला नाहीये. त्यामुळेच संघाला अनेकदा यश मिळाले आहे. यावर्षीच्या मेगा लिलावात देखील संघ चांगल्या खेलाडूंना विकत घेण्याच्या प्रयत्नात आहे.
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले की, “आम्हाला चाहत्यांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. जेव्हा कधी एमएस धोनी लिलावादरम्यान संघाची निवड करतो, तेव्हा तो चाहत्यांना कधीच निराश नाही करत. तो त्यापद्धतीनेच संघाची निवड करतो.”
तत्पूर्वी, भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रांनीही सीएसके संघाविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली होती. आकाश चोप्रांच्या मते सीएसके संघ मेगा लिलावात अनेक अष्टपैलू खेळाडूंवर बोली लावेल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे संघ मेगा लिलावात अनेक अष्टपैलू खेळाडूंवर बोली लावेल. यावेळी त्यांनी काही खेळाडूंची नावेही सांगितली आहेत.
दरम्यान, एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत चार वेळा स्पर्धेचे जेतेपद जिंकले आहे. आयपीएलच्या इतिहासातील चेन्नई दुसरी सर्वात यशस्वी फ्रेंचायझी आहे. कर्णधार धोनीचे यासाठीचे योगदान बहुमूल्य आहे. आकाश चोप्रांनी सांगितल्याप्रमाणे चेन्नईच्या आजपर्यंतच्या प्रवासात संघाच्या अष्टपैलूंची भूमिका महत्वाची राहिली आहे. चेन्नईसाठी रविंद्र जडेजा, मोईन अली आणि ड्वेन ब्रावो असे महान अष्टपैलू खेळाडू खेळले आहेत. मेगा लिलवापूर्वी सीएसकेने मोईन अली आणि रविंद्र जडेजा या दोघांना रिटेन देखील केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘धडाकेबाज’ अभिषेकसाठी पंजाब-हैदराबादमध्ये रंगली चुरस; अखेर मोठ्या रकमेसह…
‘मुंबईकर’ बनला ‘बेबी एबी’! कोट्यावधींची किंमत घेत बनला पलटनचा भाग
IPL लिलावात लखनऊचा नवाबी अंदाज! आवेश खानवर लावली विक्रमी बोली, ठरला ऐतिहासिक खेळाडू