---Advertisement---

‘मुंबईकर’ बनला ‘बेबी एबी’! कोट्यावधींची किंमत घेत बनला पलटनचा भाग

On: शनिवार, फेब्रुवारी 12, 2022 9:19 PM
baby ab
---Advertisement---

आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये मेगा लिलावाचे (mega auction) आयोजन केले गेले. मेगा लिलावात अनेक दिग्गजांसह युवा खेळाडूंवर बोली लागली. काहींना यामध्ये अपेक्षेपेक्षा कमी, तर काही खेळाडूंनी अपेक्षित किंमतीपेक्षा जास्त रक्कम मिळाली. दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस (dewald brevis) याला मुंबई इंडियन्सने ताफ्यात सामील केले. मुंबईने त्याला ३ करोड रुपयांमध्ये खरेदी केले, जी त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप अधिक रक्कम आहे.

ब्रेविसने मेगा लिलावासाठी त्याची बेस प्राइस २० लाख रुपये ठेवली होती. पण अनेक फ्रेंचायझींनी त्याला विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याची किंमतही वाढत गेली. मुंबईने अखेर त्याला संघात सामील केले. ब्रेविसची नेहमीच दक्षिण अफ्रिकाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज एबी डिविलियर्ससोबत तुलना होत आली आहे. डिविलियर्सने स्वतः अनेकदा या युवा खेळाडूचे त्याच्या फलंदाजीसाठी कौतुक केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात ब्रेविसने दक्षिण अफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले आणि अप्रतिम प्रदर्शनही करून दाखवले. याच कारणास्तव त्याची किंमत अनेक पटींनी वाढली. विश्वचषक स्पर्धेत त्याने अनेक मोठे विक्रम मोडले. या स्पर्धेत त्याने दक्षिण अफ्रिकेसाठी ५०६ धावा केल्या. आणि शिखर धनवचा जुना विक्रम मोडीत काढला. विश्वचषक स्पर्धेत त्याने दोन शतक आणि तीन अर्धशतके केली होती.

ब्रेविसने यापूर्वी म्हटल्याप्रमाणे  रॉयल चॅलेंजर्स बेगंलोर हा त्याचा आवडता आयपीएल संघ आहे, पण त्या संघासाठी त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाहीय. मुंबई इंडियन्सने त्याला विकत घेतले असले, तर त्याला संधी मिळण्यासाठी तो नक्कीच आनंदी असेल. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचाही ब्रेविस मोठा चाहता आहे. आयपीएल २०२२ मध्ये डेविड ब्रेविसचे प्रदर्शन असे असेल, हे पाहावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

हुडा-कृणाल एकत्र आल्याने सेहवागकडून मजेदार ट्विट; म्हणाला…

आयपीएल लिलावातही शाहरुख ‘सुपरहिट’! तब्बल ९ कोटी रुपयांमध्ये ‘या’ संघात झाला सामील

‘गेले दोन महिने माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस’, श्रेयस अय्यरने मांडली व्यथा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---