---Advertisement---

हुडा-कृणाल एकत्र आल्याने सेहवागकडून मजेदार ट्विट; म्हणाला…

On: शनिवार, फेब्रुवारी 12, 2022 8:28 PM
---Advertisement---

यावर्षी इंडियन प्रीमीयर लीगचा (IPL 2022) १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा लिलाव आयोजित केला गेला आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रेंचायझींमुळे मेगा लिलावात एकूण १० संघांनी खेळाडूंवर बोली लावली. लिलावाच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू कृणाल पंड्या (Krunal Pandya) आणि दीपक हुड्डा (Deepak Hooda) या दोघांना लखनऊ सुपर जायंट्सने संघात सामील केले. यानंतर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virendra sehwag) याने ट्वीट करून खास प्रतिक्रिया दिली आहे.

कृणाल पंड्या आणि दीपक हुडा यांना लखनऊ संघात एकत्र घेतल्यामुळे चाहत्यांमध्ये याबाबतील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लखनऊने कृणालला ८ कोटी आणि २५ लाख रुपयांमध्ये खरेदी केले. तर दीपक हुडासाठी फ्रेंचायझीने ५ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले आहेत. या दोघांमधील वाद काही दिवसांपूर्वी जगासमोर आला होता. अशात विरेंद्र सेहवागनेही याविषयी एका खास ट्वीट करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. सेहवाने ट्वीटमध्ये लिहिले की, “हुडा आणि कृणाल चांगली जोडी असेल. बडोदा संघाने विभागले, परंतु लखनऊने एकत्र आणले.”

दरम्यान, दीपक हुडा आणि कृणाल पंड्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदा संघासाठी अनेक वर्ष एकत्र खेळले. पण मागच्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि संघाने हुडाला बाहेर केले. कर्णधार कृणालवर संघाने अधिक विश्वास दाखवला होता. त्यानंतर दीपक हुड्डाने असे आरोप केले की, कृणाल संघात स्वतःच्या मनाका कारभार करतो आणि गैरवर्तनही करतो. हुडाने सांगितल्याप्रमाणे कृणालने अनेकदा त्याच्यासाठी अपशब्दही वापरले होते. या संपूर्ण प्रकारणानंतर हुडाने बडोदा संघाची साथ सोडली. विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या मागच्या हंगामात दीपक हुड्डाने राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच काही दिवसांपूर्वी त्याने भारतीय संघासाठीही पदार्पण केले आहे. आगामी आयपीएल हंगामात या दोन खेळाडूंमधील संबंध असे असतील हे पाहावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

स्वागत ‘पंड्या’जी लखनऊ में है! कृणाल पंड्यावर लागली अनपेक्षित बोली, रक्कम पाहून सर्वच चकित

आता बटरलसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणा अश्विन! सेहवागने जुन्या वादाची काढली आठवण

आता बटरलसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणा अश्विन! सेहवागने जुन्या वादाची काढली आठवण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---