भारतीय संघासाठी वेस्ट इंडिज दौरा खूपच आनंददायी होता. धवनच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच येथे तीन सामन्यांची वनडे मालिका ३-० अशी जिंकली. यानंतर संघाने टी-२० मालिकेतही चांगली कामगिरी करताना ४-१ ने विजेतेपद पटकावले. वेस्ट इंडिज दौरा संपल्यानंतर भारतीय संघाचा पुढचा सामना झिम्बाब्वेशी त्यांच्याच भूमीवर आहे. येथे टीम इंडिया यजमान संघासोबत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या वेळापत्रकासह भारत-झिम्बाब्वे दौऱ्याचा इतिहासावर आपण नजर टाकणार आहोत.
रिपोर्टनुसार, भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी १५ ऑगस्टला हरारेला पोहोचू शकतो. ही मालिका १८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. वनडे मालिकेतील सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहेत. सहा वर्षांतील भारताचा हा पहिला झिम्बाब्वे दौरा आहे. भारत झिम्बाब्वेला गेल्या वेळी एमएस धोनी संघाचे नेतृत्व करत होता. यादरम्यान भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली.
असे असेल झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक
भारत विरुद्ध झिम्बाब्वे – पहिली वनडे – १८ ऑगस्ट २०२२ – दुपारी १२.४५ – हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
भारत विरुद्ध झिम्बाब्वे – दुसरी वनडे – २० ऑगस्ट २०२२ – दुपारी १२.४५ – हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
भारत विरुद्ध झिम्बाब्वे – तिसरी वनडे – २२ ऑगस्ट २०२२ – दुपारी १२.४५ – हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू:
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
दरम्यान, २०१६मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाने शेवटची वेळ ३-० ने जिंकली होती. टीम इंडियाने यजमान संघाच्या मैदानावर आतापर्यंत एकूण १७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान ब्लू आर्मीने १५ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी केवळ दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. १९९७मध्ये झिम्बाब्वेने भारताचा आठ गडी राखून पराभव केला होता. यानंतर संघाला ३० सप्टेंबर १९९८ रोजी दुसरा विजय मिळाला. त्यानंतर भारतीय संघाला त्यांच्या भूमीवर झिम्बाब्वेविरुद्ध एकही पराभव झालेला नाही. टीम इंडियाने सध्या त्यांच्याविरुद्ध सलग ११ सामने जिंकले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Breaking: फायनलमध्ये पीव्ही सिंधूचा ‘गोल्डन स्मॅश’! भारताच्या पदरात १९वे सुवर्ण पदक
VIDEO | लिविंगस्टोनने पाडला षटकारांचा पाऊस, ‘द हंड्रेड’मध्ये राशिद खानची धुलाई