भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकताच ब्रिस्बेन येथील कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर -गावसकर मालिका 2-1 ने जिंकली आहे. भारताच्या या विजयात कर्णधार अजिंक्य रहाणेने महत्वाची भूमिका बजावली. संपुर्ण जगभरात या विजयाचा आनंद साजरा केला जातोय. अशातच भारताचे माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू सुनील गावसकर यांची प्रतिक्रिया समोर येत असून त्याच्या मते, कर्णधार अजिंक्य रहाणे वगळता सर्व लोक या विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील.
एका वृत्तपत्रात गावसकर यांनी भारताच्या विजयाबद्दल लेख लिहला आहे. गावसकर लिहतात, “ऑस्ट्रेलियात मिळवलेला हा विजय खूप काळापर्यंत साजरा केला जाईल. खासकरून भारत विरुद्ध इंग्लंड मालिका होईपर्यंत हा विजय फार चर्चिला जाईल. या मालिकेत आपल्या रणनीतीने संघाला विजय मिळवून देणाऱ्या अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त, प्रत्येक जण मालिका विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण विजयाला अनेक बाप असतात पण पराभव हा अनाथ असतो.”
गावसकर यांनी अजिंक्यच्या शांत स्वभावाचे देखील कौतुक केले आहे. गावसकर यांनी लिहले ,” रिषभ पंतने विजयी चौकारा मारला व संपूर्ण स्टेडियममध्ये जल्लोष झाला. मोहम्मद सिराज व शुभमन गिल मैदानात जाऊन रिषभ पंतला आलिंगन देत होते. संपूर्ण संघ जल्लोष करत असताना अजिंक्य आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे शांततेत आनंद साजरा करताना दिसला. अजिंक्य हा फार संयमी व विनम्र व्यक्ती आहे.”
रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केले होते. विराट पहिल्या कसोटी सामन्यानंतर पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
लवकरच भारतात येतोय! बेन स्टोक्सने ट्विटरवर पोस्ट करत दिली माहिती, फोटो होतोय व्हायरल
टीम इंडिया तयारीत राहा; कसोटी मालिकेसाठी दिग्गजाने इंग्लंड संघाला दिलाय ‘हा’ गुरु मंत्र
इंग्लंडकडून ७४५ खेळाडू खेळले पण ‘असा’ विक्रम करणारा जो रुट दुसराच क्रिकेटपटू






