क्रिकेटच्या मैदानावर रविवारी (13 जानेवारी) एक दु:खदायक घटना घडली. गोव्याचे माजी क्रिकेटपटू राजेश घोडगे हे मार्गव येथे एका स्थानिक सामन्यात खेळत असताना अचानक मैदानात कोसळले. त्यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.
मार्गव क्रिकेट क्लबचे संचालक पुर्व भेमब्रे यांनी या घटनेविषयी माहिती दिली आहे.
43 वर्षीय राजेश हे 30 धावांवर खेळत होते. नॉन-स्ट्राईकला उभे असताना ते खेळपट्टीवर कोसळले. यावेळी या स्पर्धेच्या आयोजकांनी त्यांना लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यानंतर त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला.
“घोडगे हे दररोज क्रिकेट खेळत असे. मात्र आज झालेल्या घटनेने आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो”, असे भेमब्रे म्हणाले.
घोडगे यांनी 90च्या दशकात गोव्याकडून 2 प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत. तर लीस्ट एचे 8 सामने खेळले आहेत.
या आधीही काही क्रिकेटपटूंवर मैदानावर खेळत असताना काळाने झडप घातली आहे. 1870ला क्रिकेटच्या मैदानावर पहिल्यांदा अशी घटना घडली होती. लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात 25वर्षाचा जॉर्ज समर्स हा नॉटींगघमशायरकडून खेळताना मृत्यु पावला होता.
त्याचबरोबर अॅंडी दुकाट, अब्दुल अझिझ, विल्फ स्लॅक, रमन लांबा, वसिम राजा, झुल्फिकार भट्टी आणि फिल ह्युजेस या क्रिकेटपटूंना सुद्धा क्रिकेटच्या मैदानावर त्यांचे प्राण गमवावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–२०१८मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एबी खेळणार २०१९मध्ये या संघाकडून
–‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचा खास विक्रम पाकिस्तानच्या यष्टीरक्षकाने मोडला
–त्या ६२ धावा हिटमॅन रोहितचे नाव कांगारुंच्या भूमीत सुवर्णाक्षरांनी लिहीणार