भारतीय संघाला पहिला वनडे विश्वचषक मिळवून देणारे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना जागतिक क्रिकेटमधील काही मोजक्या दिग्गजांमध्ये गणले जाते. कपिल देव भारतीय संघाच्या इतिहासातील एक महान कर्णधार आहेत. अशात भारताचा माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश (Dodda Ganesh) याने कपिल देव यांच्यासाठी एक मागणी केली आहे. गणेशच्या मते कपिल यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित केले गेले पाहिजे.
कर्नाटक संघाच्या या माजी खेळाडूने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ही मागणी केली आहे. भारताच्या इतिहासात सचिन तेंडुलकर एकमेव खेळाडू आहे, ज्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. सचिनने हे अनेकदा सांगितले आहे की, १९८३ मधील विश्वचषक विजयामुळे त्याला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली होती. त्यानंतर सचिनने स्वतःची कारकीर्द घडवली आणि २०११ साली विश्वविजेत्या संघाचा भाग ठरला.२०११ साली भारताने श्रीलंका संघाचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता.
अशात माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश याच्यामते, भारताला १९८३ विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांना देखील भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले पाहिजे. कपिल देव यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने वेस्ट इंडीज संघाचा पराभव करून हे जेतेपद जिंकले होते. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली होती आणि संघ १८३ धावांवर सर्वबाद झालेला. भारतासाठी के श्रीकांत यांनी सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली होती.
इंग्लंडच्या लॉर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी जादुई कामगिरी केली होती आणि संघाला विजय मिळवून दिला होता. मोहिंदर अमरनाथ यांना या अंतिम सामन्यात सामनावीर निवडले गेले होते. त्यांना ७ षटकांमध्ये १२ धावा दिल्या होत्या आणि तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या, तसेच त्यांनी फलंदाजीत २६ धावांचे योगदान दिले होते. सामन्यात कर्णधार कपिल देव यांनी एक अप्रतिम झेल घेतला होता. त्यांनी घेतलेला हा झेल विवियन रिचर्ड्स यांचा होता.
महत्वाच्या बातम्या –
मॅक्लनघनची भारतीय संघावर जहरी टीका; चाहत्यांनी दिले सडेतोड उत्तर
वरिष्ठ भारतीय महिला क्रिकेटपटू म्हणतेय, “आम्ही वुमेन्स आयपीएलबाबत आशावादी”
“रोहित यावर्षीचा सर्वोत्तम टी२० व कसोटी फलंदाज असेल”