पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफ याने नुकताच निवृत्त झालेला अनुभवी अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम याने निवृत्तीतून पुनरागमन करण्याचे आवाहन केले आहे. रशीद लतीफच्या मते, इमाद वसीम हा पाकिस्तानचा सर्वोत्तम खेळाडू आहे आणि तो फलंदाजीत खूप योगदान देऊ शकतो, त्यामुळे त्याने निवृत्तीतून माघार घ्यावी.
इमाद वसीम ( Imad Wasim) याने नुकतीच अचानक निवृत्ती जाहीर केली होती. तो म्हणाला की, “मी अलीकडच्या काळात माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल खूप विचार करत आहे आणि मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याची हीच योग्य वेळ आहे. मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आभार मानतो आणि मला अभिमान आहे की मी पाकिस्तानसाठी खेळू शकलो.”
ट्विटरवर पोस्ट करत रशीद लतीफ (Rashid Latif) म्हणाला, इमाद वसीमने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा. “इमाद पाकिस्तान संघाचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे आणि तो फलंदाजीत संघाला खूप मदत करू शकतो. संघाचा सर्वात प्रभावशाली खेळाडू विश्वचषकात नसेल, तर ते इमाद वसीमचे नुकसान नाही, तर ते पाकिस्तान संघाचे नुकसान आहे. मोहम्मद हाफिजला त्याला परत आणायचे आहे. लीगमध्ये खेळायचे असेल तर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टपासून वेगळे व्हा पण पाकिस्तान संघासाठी स्वत:ला उपलब्ध ठेवा.”
इमाद वसीम गेल्या काही वर्षांपासून टी20 क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत होता, त्यामुळेच त्याने यावर्षी राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. इमाद वसीम या वर्षी एप्रिलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून तो पाकिस्तान संघाबाहेर होता. (Ex-Pakistani Cricketer’s Valuable Advice to Retired Imad Wasim Said You from retirement)
म्हत्वाच्या बातम्या
IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉ रिटेन, तर केकेआरने मुख्य अष्टपैलू खेळाडूला केले रिलीज
IPL 2024 मधून खेळाडूंच्या माघारीचे सत्र सुरूच! स्टोक्सपाठोपाठ आणखी एका इंग्लिश सुपरस्टारची ना