IND vs AFG 3rd T20I : बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात तिसरा आणि शेवटचा टी20 सामना झाला. या थरारक सामन्यात शेवटी भारताने विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली. हा सामना निश्चितच, सर्वात थराराक सामन्यांमध्ये गणला जाईल. ज्यात विराटने एक अशी करामत केली जी बघून सगळेच अवाक् झाले.
भारताला संकटाबाहेर काढण्याची विराट कोहलीची(Virat kohli) ही पहिली वेळ नव्हती. यावेळी मात्र फलंदाजीने नव्हे तर आपल्या क्षेत्ररक्षणाने त्याने ही कामगिरी केली. सामन्याच्या 17 व्या षटकात अफगाणला 20 चेंडूत 48 धावांची गरज असताना विराटने उत्तूंग झेप घेत चेंडूला सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून रोखले. हे करताना त्याने आपल्या संघासाठी 5 मौल्यवान धावा वाचवल्या. या धावा वाचवल्या नसत्या तर कदाचित भारताला पराभवाचा सामना करावा लागला असता.
Excellent effort near the ropes!
How’s that for a save from Virat Kohli 👌👌
Follow the Match ▶️ https://t.co/oJkETwOHlL#TeamIndia | #INDvAFG | @imVkohli | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/0AdFb1pnL4
— BCCI (@BCCI) January 17, 2024
3-0 च्या फरकाने मालिका खिशात
बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला सामना आपल्या जिंकत, अफगाणिस्तानला व्हाइटवॉश दिला. आगामी टी20 विश्वचषकापूर्वीची ही भारतीय संघाची शेवटची टी20 मालिका होती. त्यामुळे यात चांगले प्रदर्शन करणे गरजेचे होते. याबरोबरच अफगाणिस्तानविरूद्ध आजपर्यंतच्या झालेल्या 13 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताने 10 विजय मिळवले आहेत. यात 6 टी20 विजयांचाही समावेश आहे. आता मात्र भारतीय संघ आयपीएलनंतर सरळ विश्वचषक खेळताना दिसेल. (IND vs AFG Virat turns Superman in Bangalore converts Karim Janat’s six into a run)
हेही वाचा
IND vs AFG: ‘आम्ही पुन्हा वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करू’ अफगाणिस्तानविरूद्ध मालिका जिंकल्यानंतर रोहितचं वक्तव्य
IND vs AFG । 40 ऐवजी 44 षटकाचांचा झाला टी20 सामना, वाचा कसा होता डबल सुपर ओव्हरचा थरार?