आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा यजमान पाकिस्तान संघ स्पर्धेमधून खूप आधीच बाहेर पडला आहे. तसेच पाकिस्तान मध्ये खेळण्यासाठी भारतीय संघाने नकार दिला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हायब्रीड मॉडेलच्या अंतर्गत त्यांचे सर्व सामने दुबई मध्ये खेळत आहे. आता क्रिकेटनंतर पाकिस्तानला फुटबॉल मधून धक्का बसला आहे. फिफाने पाकिस्तान सहित रशिया आणि काँगो यांना वर्ल्डकप 2026 स्पर्धेमधून बाहेर केल आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी मधील पराभवानंतर आता फिफानेही पाकिस्तानला बाहेर केल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच यजमान पद संयुक्त राज्य अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांकडे असणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदा 48 संघ भाग घेणार आहेत. तसेच ही स्पर्धा खूप मोठी होणार आहे. यादरम्यान फिफाने पाकिस्तान शिवाय रशिया आणि काँगो या देशांना फुटबॉल खेळण्यावर बंदी घातली आहे. आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की, या देशांवर का बंदी घातली? मीडिया रिपोर्ट नुसार पाकिस्तान फुटबॉल महासंघ यांनी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक असलेलं संविधान स्वीकारलं नाही. तसेच फिफाने आणि आशियाई फुटबॉल परिसंघाने हे संविधान लागू करण्याची अट ठेवली होती.
रशिया फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी योग्यतेची आवश्यकता पूर्ण करू शकत नाही. तीन वर्षांपूर्वी रशिया राष्ट्रीय फुटबॉल संघाने युक्रेन वर आक्रमणातून सुरू होणारे फिफा (FIFA) आणि (UEFA) दोन्ही स्पर्धे अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यापासून बंदी घातली होती, आता रशियावर सुद्धा स्पर्धा खेळण्यासाठी बंदी आहे.
तसेच फिफने कांगो देशालाही स्पर्धेतून बाहेर केल आहे. फिफा स्पर्धेच्या नियमानुसार फुटबॉल प्रशासनामध्ये कोणताही बाहेरचा प्रभाव पडण्याची परवानगी नाही. तसेच कांगो वेळेनुसार समस्येवर तोडगा काढू शकले नाहीत. त्यामुळे फिफाने त्यांना स्पर्धेतून बाहेर केल आहे.
हेही वाचा
रोहित शर्माच्या आठवणींना तडा! जिथे क्रिकेट शिकला ते मैदान जमीनदोस्त
बापरे! चॅम्पियन्स ट्रॉफीमधील या मॅचने तोडले सगळे ऑनलाईन विक्रम, तब्बल एवढ्या…
भारताचा शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल सामना कोणाविरुद्ध? जाणून घ्या निकाल






